Dr. Sujay Vikhe : नगर : माजी खासदार डॉ.सुजय विखे (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून दिला होता. त्यावेळी मंजूर झालेल्या निधीतून शहरात अजूनही विकासकामे सुरु आहेत. खासदार या नात्याने डॉ.सुजय विखे यांनी शहराच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले, असे प्रतिपादन भाजपचे (BJP) शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांनी केले.
नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
बाबासाहेब नागरगोजे यांच्या ह्स्ते कामचा प्रारंभ
प्रभाग १ मधील बोल्हेगाव फाटा ते अमरधाम रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद बारस्कर यांनी तत्कालीन खासदार डॉ.सुजय विखे यांच्या कडे पाठपुरावा करून निधी मजूर करून घेतला होता. या कामचा प्रारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व ज्येष्ठ उद्योजक बाबासाहेब नागरगोजे यांच्या ह्स्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे सावेडी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, रमेश सप्रे, आकाश बारस्कर, गणपत बारस्कर, अंकुश बारस्कर, हेमंत पवार, सुमित बटुळे, महेश बारस्कर, नामदेव शिर्के, दिलीप पटेकर, पंढरीनाथ सप्रे, बाबू खंबे, संपत रोहोकले व राम बडे उपस्थित होते.
अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप
शरद बारस्कर म्हणाले, (Dr. Sujay Vikhe)
बोल्हेगाव परिसारत अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी डॉ.सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने रस्त्याच्या कामाची वर्षानुवर्षे वर्षांची मागणी आता पूर्ण झाली आहे. या भागाच्या विकासासाठी भाजपच्या माध्यमातून अनेक कामे केली जाणार आहेत, असे ते म्हणाले.



