Dr. Sujay Vikhe Patil | नगर : आचार संहिता जाहीर होताच भाजपने (BJP) आज नगर शहरातील माऊली सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) उपस्थित होते. या मेळाव्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीतील नेत्यांवर नाव न घेता टीकेची तोफ डागली.
नक्की वाचा : टाकळी मानूर दरोड्यातील आरोपी गजाआड
ते पराभवाच्या भीतीने भाजपमध्ये (Dr. Sujay Vikhe Patil)
घाबरून महाविकास आघाडीतील नेते भाजप जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. यावर डॉ. विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात टीव्हीवर चार मनोरुग्ण दिसतात. आचारसंहितेमुळे त्यांची नावे मी उघड करू शकत नाही. त्यापैकी एक काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत. उर्वरित तीन नावे मी नंतर सांगेल. महाविकास आघाडीतील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयी झंजावाताला घाबरून भाजपमध्ये येत आहेत. मोदींच्या झंजावाता पुढे कोणी टिकणार नाही, म्हणून ते पराभवाच्या भीतीने भाजपमध्ये येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
भाजपमध्ये उमेदवार महत्त्वाचा नाही. येथे सर्वजण नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी काम करत आहेत. मला उमेदवारी मिळाली नसती तरी मी उमेदवारी मिळालेल्या व्यक्तीसाठी भाषण केले असते. संघटनेसाठी आम्ही सर्वजण एक आहोत. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने काम करू. भाजप कार्यकर्ते व नेत्यांत उत्साह आहे, असे त्यांनी विश्वासाने सांगितले.
हेही पहा : RCB च्या महिला संघाने करून दाखवले! पहिल्यांदाच पटकावलं विजेतेपद
आधी जागा वाटप निश्चित करण्याचा सल्ला (Dr. Sujay Vikhe Patil)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून डॉ. विखे पाटील म्हणाले की, भाषण कमी करा, जागा वाटप निश्चित करा. उमेदवारांची नावे महाराष्ट्राला सांगा. मोदीच्या झंजावाता पुढे यांच्या जागा ठरत नाहीत. आधी त्यांनी जागा वाटपासाठी वेळ द्यावा. नंतर भाषणे करावीत, अशी टीकाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.