Dr. Sujay Vikhe Patil | नगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी पुन्हा एकदा संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना आमदार करण्याचा संकल्प केला आहे. आमदार जगताप यांच्यासाठी चांगले वातावरण असल्याने नगर शहरातील निवडणूक संपल्यातच जमा आहे. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे, असे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव जरी झाला असला तरी नगर शहरातून मोठा लीड मला मिळाला. त्यासाठी संग्राम जगताप यांनी प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने काम केले. आता अशीच ताकद सर्वांनी मिळून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभी करून त्यांना माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा, असे आवाहन माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा: श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांच्या सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी?
यांची उपस्थिती (Dr. Sujay Vikhe Patil)
महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी (ता. ११) सायंकाळी नगर शहरात महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी डॉ.विखे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजप सरचिटणीस सचिन पारखी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेंद्र गांधी, शहर प्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक धनंजय जाधव, आरपीआयचे नेते अजय साळवे, सुरेश बनसोडे, अरविंद शिंदे, रेश्मा आठरे, अंजली आढाव, गीता गिल्डा, प्रिया जानवे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला आम्ही बांधील (Dr. Sujay Vikhe Patil)
डॉ.विखे पुढे म्हणाले, निवडणुकीतील विरोधकांचे काहीच अस्तित्व नाही. त्यांची संघटना एका खोलीत मावणारी आहे. मात्र, आमची महायुती हे विशाल आहे. महायुतीचे नेते देवेंद्र फडवीसांच्या आदेशाला आम्ही बांधील असून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडणून आणण्यासाठीही आम्ही कटीबद्ध आहोत. या निवडणुकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अस्तित्व दाखवून जास्तीत जास्त लीड आमदार जगतापांना द्यावा. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर नगरची नवी एमआयडीसी, नवे डीपी रस्ते, पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मारकाचे काम असे अनेक प्रलंबित कामे मी व आमदार संग्राम जगताप मिळून करणार आहोत.
बैठकीच्या प्रास्तविकात संपत बारस्कर म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरा पासून महायुतीमधील पक्षाचे पदाधिकारी पळत आहेत. यामध्ये भाजपचे काम मोठे आहे. महायुतीमधील सर्व एकसंघाने, एकदिलाने आमदार संग्राम जगताप यांचे काम करत आहेत. या निवडणुकी नंतर राज्यात पुन्हा महायुतीचेच राज्य येणार असून संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा निवडून येत मंत्रीही होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.