Dr. Sujay Vikhe Patil : श्रीगोंदा | चांगले काम करणाऱ्या अनेकांचा श्रीगोंदेकरांनी कार्यक्रम केला आहे. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला. निवडणुकीत काहींनी सोबत राहून माझा घात केला, त्यांची यादी तयार ठेवली आहे. भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्या सगळ्यांचा हिशोब चुकता करू, असा इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिला.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का ? -विजय वडेट्टीवार
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले… (Dr. Sujay Vikhe Patil)
श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त विखे पाटील बोलत होते. डॉ. विखे पाटील म्हणाले, आपण चूक सुधारून थेट जनतेशी कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. खासदारकी नसल्याने मला फरक पडत नाही. मात्र, एक चुक तालुक्याला मागे नेणार आहे, याचा विचार कोणी केला नाही, असा टोलाही विखे यांनी लगावला. तालुक्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी आरक्षित केले आहे. मात्र, त्यासाठी कोणाच्याही पाण्याला धक्का लावलेला नाही. साकळाईचा ४९५ कोटीचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे गेला आहे. महिनाभरात मान्यता मिळून येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया व भूमिपूजन करण्याची जबाबदारी माझी आहे. कुकडीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगदा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच कार्यकाळात पूर्ण होईल, असेही विखे यांनी सांगत चांगलीच राजकीय टोलेबाजी केली.
अवश्य वाचा : देवमाणूस मध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!
यांची उपस्थिती (Dr. Sujay Vikhe Patil)
यावेळी रमेश गिरमकर, पुरषोत्तम लगड, बाळासाहेब गिरमकर, पाचपुते मामा, सिद्धेश्वर देशमुख, दत्तात्रय रणसिंग, रामदास झेंडे, बाळासाहेब भोवले, राजेंद्र इंगवले, बिभीषण पवार, नितीन साबळे, बापूतात्या गोरे, अशोक खेडके, संग्राम घोडके,अंबादास औटी, संजय खेतमाळीस उपस्थित होते. तर बाळासाहेब सावळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वसंतराव मोहारे यांनी स्वागत केले. दादासाहेब साबळे यांनी आभार मानले.