Dr. Sujay Vikhe Patil : भाजपकडून अहिल्यानगर दक्षिणेत पुन्हा डॉ. सुजय विखे पाटील

Dr. Sujay Vikhe Patil : भाजपकडून अहिल्यानगर दक्षिणेत पुन्हा डॉ. सुजय विखे पाटील

0
Dr. Sujay Vikhe Patil : भाजपकडून अहिल्यानगर दक्षिणेत पुन्हा डॉ. सुजय विखे पाटील
Dr. Sujay Vikhe Patil : भाजपकडून अहिल्यानगर दक्षिणेत पुन्हा डॉ. सुजय विखे पाटील

Dr. Sujay Vikhe Patil : नगर : भाजपने (BJP) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी (Election) जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून राज्यात ७५ ठिकाणी नेत्यांची नियुक्ती केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची नियुक्ती करण्यात आली. तर अहिल्यानगर शहर आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute), अहिल्यानगर उत्तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तर अहिल्यानगर दक्षिण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील

सुजय विखे पाटील दक्षिणेत पुन्हा सक्रिय

डॉ. सुजय विखे पाटील पूर्वी दक्षिण मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मधल्या काळात ते उत्तर भागातच जास्त सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दक्षिण भागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून पक्षाने त्यांना पुन्हा या भागात सक्रिय करण्याचे ठरविल्याचे दिसून येते.

नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला

शिवाजीराव कर्डिले हयात नसल्याने जबाबदारी (Dr. Sujay Vikhe Patil)

दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले हयात असते तर कदाचित ही जबाबदारी त्यांच्याकडे असती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे घटनात्मक पदावर असल्याने त्यांच्याकडे थेट पक्षीय जबाबदारी दिली नसावी, असे ही बोलले जात आहे.