
Dr. Sujay Vikhe Patil : नगर: सावेडी, बोल्हेगाव, केडगाव आणि तपोवन या नव्याने विकसित होत असलेल्या चारही उपनगरांसाठी पुढील काळात एकत्रितपणे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च (Fund) करून शहराच्या तोडीस तोड सर्वांगीण विकास (Development) करण्याचा ठाम संकल्प करण्यात येणार असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा : सिसपे घोटाळ्याप्रकरणी तपासाला निर्णायक वळण; पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली ही माहिती
विकासाच्या मुद्द्यावरच जनतेसमोर जाणार
श्रेयस लॉन्स, तपोवन रोड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्रमांक १ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवार शारदा दिगंबर ढवण यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावरच थेट जनतेसमोर जाणार असून ही भूमिका कोणाच्या विरोधासाठी नाही, तर लोकांशी संवाद साधून विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आहे. पराभव झाला तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही. आजही नगरमध्ये प्रचाराला गेल्यावर लोक ‘खासदार’ म्हणूनच हाक मारतात, हे आपल्या कामातून कमावलेले भांडवल आहे. आज बाजारपेठेत प्रचार रॅली काढत असताना व्यापारी म्हणाले काही झाले तरी पुढचे खासदार तुम्हीच अशी भावना व्यक्त केली, असून त्यामुळे मतदान अत्यंत जपून व विचारपूर्वक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : देवेंद्र मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे द्या… विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा
नवीन विळद येथे एम आयडीसी उभारली जाणार (Dr. Sujay Vikhe Pati)
आपण खासदार नसताना ही आणि ढवण ताई नगरसेविका नसतानाही विकासाची दिशा ठरवली गेली होती, असे सांगत त्यांनी नमूद केले की माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, मात्र विजय ‘अहिल्यानगर’ म्हणून होणार आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो, याचे उदाहरण देताना एमआयडीसी चौकात दोन फ्लायओव्हरचे काम सुरू असून लवकरच नवीन विळद येथे एम आयडीसी उभारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार असताना शहरात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णयही याच भूमिकेतून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे म्हणाले आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजच खऱ्या अर्थाने विकास करू शकतो, असे नमूद करत त्यांनी राजकारणातील दुटप्पीपणावरही टीका केली. गरीब म्हणून मते मागायची आणि निवडून आल्यानंतर टक्केवारी घ्यायची प्रवृत्ती बदलली पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आज राजकीय परिस्थितीत कोण कोणाबरोबर आहे हे स्पष्ट नसले तरी विकासासाठी योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार संग्राम जगताप आणि मी, आम्ही दोघेही राज्यातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील विद्यार्थ्यांसाठी सावेडी येथे १५ कोटी रुपये खर्चून भव्य ग्रंथालय उभारण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. बोल्हेगाव परिसरात पुलाजवळ पाणी साचण्यामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होत्या. मात्र सिमेंट काँक्रिटीकरण करून त्या ठिकाणी दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आपण आणि आमदार संग्राम जगताप यांनी संयुक्तपणे प्रयत्न केल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.


