Dr. Sujay Vikhe Patil | नगर : अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) खासदारांकडून मतदारसंघाच्या विकास कामांपेक्षा टीकाटिप्पणीवरच अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे मतदार संघातील विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे शहरासह मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांना भाजपने (BJP) राज्यसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी भिंगार छावणी परिषदेचे मानद सदस्य वसंत राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
हे वाचा – भारताचा माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी यांची श्री विशाल गणेश मंदिराला सदिच्छा भेट
भाजपच्या कोट्यातून संधी द्या
निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होणार आहेत. या रिक्त झालेल्या जागेपैकी एका जागेवर भाजपच्या कोट्यातून अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ.सुजय विखे यांना संधी द्यावी. डॉ. विखे यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांमुळे जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागल्या आहेत. प्रशासनाकडून परिणामकारक पद्धतीने काम करून घेण्याची कार्यशैली त्यांच्याकडे आहे. सुसंस्कृत घराण्याचा वारसा, उच्च शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण सेवा, दांडगा जनसंपर्क आणि पराभवानंतरही खचून न जाता पुन्हा जोमाने जनतेमध्ये जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
हे पहा – श्रीगोंद्यात १ कोटी ८५ लाखांचा ‘गोवा पॅटर्न’ उद्ध्वस्त!
विकासाचा अनुशेष भरून निघेल
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही डॉ.सुजय विखे यांनी विधानसभा, नगरपरिषद व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा विजय मिळवून दिला आहे. पक्षाच्या बळकटीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. अशा विकासदृष्ट्या दूरदृष्टी असलेल्या, उच्चशिक्षित व तरुण नेतृत्वाला राज्यसभेवर संधी दिल्यास जिल्हयातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, ऊर्जा व उत्साह निर्माण होईल व विकासाचा अनुशेष भरून निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा – रोहित पवारांच्या मागणीला यश; अजितदादांच्या अपघाताची AAIB चौकशी



