V Narayanan:डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार  

0
डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार 
डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार 

V Narayanan : डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. narayanan) यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे नवीन अध्यक्ष (ISRO New Chairmen) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ.व्ही.नारायणन हे सध्याचे इस्रो प्रमुख डॉ.एस.सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील. त्यांना अंतराळ विभागाचे सचिवही करण्यात आले आहे. ते सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक आहेत. डॉ. एस. सोमनाथ त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून १४ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी डॉ. व्ही. नारायणन यांची नियुक्ती मंगळवारी (ता.७) जाहीर करण्यात आली.

नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?  

डॉ.व्ही.नारायणन यांची कारकीर्द (V Narayanan)

ज्येष्ठ शास्त्रज्ञ नारायणन यांना ४० वर्षांचा अनुभव आहे. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनमध्ये ते तज्ज्ञ आहेत. डॉ. व्ही. नारायणन यांनी इस्रोमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचं संचालक म्हणून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स वितरित करण्यात आले आहेत. डॉ. व्ही. नारायणन हे इस्रोमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.

डॉ. व्ही. नारायणन यांनी GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचं प्रकल्प संचालक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, C25 स्टेज यशस्वीरित्या विकसित केले आहेत. यासोबतच त्यांनी आदित्य, अंतराळयान आणि GSLV Mk-III मोहिमांमध्ये आणि चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मोहिमांमध्येही महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

अवश्य वाचा : अमित शाहांनी लाँच केले ‘भारतपोल’;पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार

अनेक पुरस्कारांनी सन्मानित (V Narayanan)

डॉ.व्ही.नारायणन यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना आयआयटी खरगपूरकडून रौप्य तर ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने (ASI) सुवर्णपदक देऊन गौरवलेलं आहे. तसेच एनडीआरएफकडून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here