नगर : मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ.विलास उजवणे (Vilas Ujawane) यांचे निधन (Passes Away) झाले आहे. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना, मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानं एक नाट्य, चित्रपट क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
नक्की वाचा : राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर
आज मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.डॉ. विलास उजवणे ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
अवश्य वाचा : संगमनेरच्या १०७ वर्षांच्या आजीबाई सांगतात दीर्घायुष्याचे रहस्य!
डॉ.विलास उजवणे यांची कारकीर्द (Dr.Vilas Ujawane Passes Away)
डॉ.विलास उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप सोडली होती. त्यांच्या सहजसुंदर अभिनय शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले होते. सकारात्मक भूमिकांसह त्यांच्या खलनायकी भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले. सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. या आजाराचा सामना करताना त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. याच आजाराशी झुंज देत असतानाच विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. त्यातच त्यांना कावीळची देखील लागण झाली आहे. या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची मिळकत खर्च केली होती.
आजारपणात त्यांच्याकडे कामंही नव्हतं.मात्र,या कठीण काळातून ते बाहेर पडले. मोठ्या धीराने त्यांनी या गंभीर आजाराशी लढा दिला आणि मनोरंजनविश्वात पुन्हा कमबॅक केलं होतं. ‘कुलस्वामिनी’, ‘२६ नोव्हेंबर’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.