Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Agriculture : विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation's College of Agriculture : विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

0
Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation's College of Agriculture : विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation's College of Agriculture : विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Agriculture : नगर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी शासनाकडून तसेच कृषी विभागाकडून (Department of Agriculture) विविध योजना राबविल्या जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण (Financial Empowerment of Farmers) करण्यासाठी आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, तसेच जैविक खते पद्धत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे प्रतिपादन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयातील (Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Agriculture) कृषिकन्या वैष्णवी बनकर यांनी केले.

नक्की वाचा : बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची

मांजरसुबा येथे

अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय यांच्या ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी कृषिकन्या मांजरसुबा येथे आल्या आहेत, यावेळी त्या बोलत होत्या. या कृषिकन्या पुढील कालावधीत शेतकऱ्यांचे अनुभव जाणून शेतक-यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेतातील अवजारांचा वापर, शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ग्रामस्थांशी चर्चा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. १० आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांची माहिती कृषिकन्या देणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार (Dr.Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Agriculture)

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. पूनम ठोंबरे तसेच विविध विषयांचे विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या वैष्णवी बनकर, वर्षा चव्हाण, प्रगती, अक्षदा फराटे, सिद्धी गाडे, प्रार्थना जाधव या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी सरपंच रुपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, ग्रामसेवक सारिका वाळुंज, सहायक कृषी अधिकारी सुविधा वाणी, ग्रामसहाय्यक सागर वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी आदी उपस्थित होते.