Drainage problem : नगर : अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर परिसरात ड्रेनेज लाईनचा (Drainage problem) प्रश्न उपस्थित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार महापालिका प्रशासनास निवेदन देऊन ही प्रश्न सुटत नसल्याने आज नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य (Drainage problem)
यावेळी वैभव कदम, रुपेश कांबळे, दत्तात्रय दळवी, राम डमाळे, विलास गायकवाड, गणेश गाडे, मनोहर बनकर, शिवाजी बोरुडे, सुशांत बोरुडे, दीपक गायकवाड, सचिन वाघमारे, शुभम गायकवाड, कृष्णा काकडे, गणेश गमे, वैभव गुंजाळ, संतोष डमाळे, संतोष गायकवाड, गौरव पाटोळे, वैभव खाडे, समर्थ तांबडे, करण सुर्वे, रवी डमाळे, सुदर्शन ठोंबे, आनंद महानवर, शुभम बोरुडे, शिवाजी पळसकर, शैलेश बोरुडे, महेश राऊत, राहुल काळे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शास्त्रीनगर भागात गेल्या अनेक महिन्यापासून ड्रेनेजलाईनचे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात साचले आहे. तेच पाणी थेट नागरिकांच्या घरात येत आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.