Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : ‘अमाशी’

Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : 'अमाशी'

0
Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : 'अमाशी'
Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : 'अमाशी'

Drama : नगर : जोगतीण ही प्रथा ८०-९०च्या दशकात सर्रास गावोगावी पाहायला मिळायची. देवाशी लग्न लागलेली तरुण जोगतीण म्हणजे गावातील पारावरचा चर्चेचा विषय असायचा. गावातील घरोघरी जोगवा मागून पोट भरणाऱ्या जोगतिणीवर गावातल्या आंबट शौकिनांची कायम नजर असणार. त्यातून एखाद्याशी सूत जमल्यास जन्माला आलेल्या अपत्यावर मात्र कोणी हक्क सांगत नाही. त्या अपत्याच्या वाट्याला कायम अवहेलना येते. अशाच जोगतिणीच्या मतिमंद मुलीच्या (Mentally Challenged Girls) वाट्याला आलेली व्यथा आणि तिला मदत करणाऱ्या सहृदयी पाटलाची कथा ‘अमाशी’ या नाटकाद्वारे (Drama) मांडण्यात आली.

Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : 'अमाशी'
Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : ‘अमाशी’

नक्की वाचा : मोठी बातमी!अभिनेता अल्लू अर्जुनला अटक  

चं. वि. जोशी लिखित, प्रदीप रासकर व विद्या जोशी दिग्दर्शित

प्रा. डॉ. चं. वि. जोशी लिखित, प्रदीप रासकर व विद्या जोशी दिग्दर्शित केडगावच्या कल्पद्रुम फाउंडेशनतर्फे ‘अमाशी’ हे नाटक बुधवारी (ता. ११) रात्री राज्य नाट्य स्पर्धेच्या अहिल्यानगर केंद्रावर सादर करण्यात आलं. पडदा उघडताच एका गावातील वडाच्या झाडाखाली असलेली देवी नजरेस पडते. देवीशेजारी अंगावर घोंगडी लपेटलेली पाठमोरी स्त्री काहीतरी अनाकलनीय गूढ बडबड करत असते. तर देवीसमोरच एक मध्यमवयीन स्वमग्न मुलगी (सायली नरवणे) स्वतःचीच चाळा करताना दिसते. त्या गावात असलेल्या एका लावण्यवती जोगतिणीवर (अश्विनी वसगडेकर) कुंभार, शिंपी, गुरव आणि भटाची वाईट नजर असते. पण ती कुणाच्याच हाती लागत नाही.

Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : 'अमाशी'
Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : ‘अमाशी’

अवश्य वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू  

गावकरी अमाशीचा बळी देण्याची योजना आखतात (Drama)

पुढे तिला कोणापासून तरी दिवस जातात. जन्माला आलेल्या बाळाला ती देवीच्या पायरीवर ठेवून कायमची गाव सोडून निघून जाते. पुढे त्या गावचे पाटील (सागर खिस्ती) त्या मुलीचा म्हणजेच अमाशीचा सांभाळ करतात. जोगतीण आईच्या पापामुळे जन्माला आलेल्या आमाशीचा गावकरी रागराग करत असतात. पाटलांनी अमाशीला लावलेला जीव पाटलीण बाईंना (संध्या पावसे) आणि गावकऱ्यांना देखवत नाही. गावात पडलेल्या दुष्काळाला अमाशीला कारणीभूत ठरवलं जातं. अंगात वारं येणारी जोगतीण गावावरील विघ्न टळावे यासाठी (रखमा) नरबळीची मागणी करते. त्यानुसार गावकरी अमाशीचा बळी देण्याची योजना आखतात. पण, ऐनवेळी पाटील येऊन अमाशीचे रक्षण करतात आणि नाटकाचा पडदा पडतो.

Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : 'अमाशी'
Drama : कुप्रथेवर माणुसकीचा विजय : ‘अमाशी’


प्रदीप रासकर आणि विद्या जोशी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. संवेदनशील पाटलांच्या भूमिकेसाठी सागर खिस्ती यांनी चांगली मेहनत घेतली. सायली नरवणे हिने एकही संवाद नसलेल्या अमाशीचा आंगिक अभिनय उत्कृष्टपणे केला. प्रदीप रासकर, कृष्णा वामने, अमोल तोडकर, साई चासकर यांनी केलेल्या गावकऱ्यांच्या भूमिका उत्तम. अश्विनी वसगडेकर यांनी विठा जोगतिणीचे पात्र चांगले वठवले. भिवा हे पात्र अनिकेत जोशी यांनी साकारले. विद्या जोशी यांचा देवी अंगात आलेला अभिनय भाव खाऊन गेला. अपर्णा देशेट्टी यांनी भिमाक्का हे पात्र चांगले साकारले.


अंजना मोरे यांचं नेपथ्य पाहताक्षणी नजरेत भरणारं होतं. उत्तम नेपथ्यामुळे कथानकात जिवंतपणा आला. गणेश लिमकर यांची संहितेनुरूप प्रकाशयोजना चांगली वाटली. विनायक पावसे यांचे संगीत संयोजन आणि चंद्रकांत सैंदाणे यांची रंगभूषा व वेशभूषा उत्तम होती. संवादातल्या काही मोजक्या चुका सोडल्या तर एकंदरीत गावाकडील अनिष्ट प्रथांचे आणि त्याबरोबरच माणुसकीचे चित्रण प्रेक्षकांपुढे उभे करण्यात आणि त्यांना अंतर्मुख करण्यात नाटक यशस्वी झाले.