‘पंचमवेद’ला द्वितीय तर ‘झिम पोरी झिम’ला तृतीय पारितोषिक
Drama : नगर : येथील सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा (State Drama Competition) झाली. या स्पर्धेतील अहिल्यानगर केंद्रावरील प्राथमिक फेरीत “मर्म’ नाटकाने (Drama) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
नक्की वाचा : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत
मर्म आणि पंचमवेद या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड
अहिल्यानगर केंद्रातून रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान, वडगाव या संस्थेच्या ‘मर्म’ या नाटकाला प्रथम पारितोषिक, सप्तरंग थिएटर्स, अहिल्यानगर या संस्थेच्या ‘पंचमवेद’ या नाटकास द्वितीय पारितोषिक तर जय बजरंग युवा सांस्कृतिक, क्रीडा, ग्रामीण, शैक्षणिक मंडळ, अहिल्यानगर या संस्थेच्या ‘झिम पोरी झिम’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शंकर घोरपडे, डॉ. राजीव मोहोळकर आणि डॉ. उषा कांबळे यांनी काम पाहिले. मर्म आणि पंचमवेद या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : शिवाजी कर्डिलेंना ‘२०२४ बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर’ पुरस्कार
अहिल्यानगर केंद्रावरील निकाल – (Drama)
दिग्दर्शनः
प्रथम पारितोषिक: रियाज पठाण (मर्म), द्वितीय पारितोषिक: डॉ. श्याम शिंदे (नाटक- पंचमवेद)
प्रकाश योजना:
प्रथम: गणेश लिमकर (तो तिचा दादला आणि मधला), द्वितीय: पवन पोटे (झिम पोरी झिम)
नेपथ्य :
प्रथम: अंजना मोरे (अमाशी), द्वितीय: क्षितीज कंठाळे (झिम पोरी झिम)
रंगभूषा :
प्रथम: चंद्रकांत सैंदाणे (राजर्षी), द्वितीय: संकेत शाह (झिम पोरी झिम)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक:
सिध्दी कुलकर्णी (कन्यादान) व कृष्णा वाळके (प्रियंका आणि दोन चोर)
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे:
रेणुका ठोकळे (प्रियंका आणि दोन चोर), शुभदा पटवर्धन (मर्म), पुनम कदम (राजर्षी), पल्लवी दिवटे (तो तिचा दादला आणि मधला), नानाभाऊ मोरे (तो तिचा दादला आणि मधला), प्रदीप वाळके (आता कसं करु), संजय लोळगे (झिम पोरी झिम), अथर्व धर्माधिकारी (आता कसं करु)