Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे ‘मर्म’

Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे 'मर्म'

0
Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे 'मर्म'
Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे 'मर्म'

Drama : नगर : मानवता धर्म सर्वधर्मांचा पाया आहे. जगातील कोणताही धर्म हिंसेला पाठबळ देत नाही. पण काहीजण धर्माचं पांघरून घेऊन स्वतःची पोळी भाजू पाहतात. माणुसकी हा चार अक्षरांचा अतिशय साधा, सोपा शब्द आहे. माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाची केलेली कदर. इतका साधा असलेला माणुसकीचा (Humanity) अर्थ राज्य नाट्य स्पर्धेतील (State Drama Competition) ‘मर्म’ या नाटकाने (Drama) समजावला. 

Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे 'मर्म'
Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे ‘मर्म’

रंगमुद्रा प्रतिष्ठानतर्फे ‘मर्म’ हे नाटक सादर

नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सही; पुण्यातील रुग्णाला मिळाली मदत

‘बुधवार (ता.५) रोजी प्रा. रवींद्र काळे लिखीत वडगाव गुप्ता येथील रंगमुद्रा प्रतिष्ठानतर्फे ‘मर्म’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाले. पडदा उघडताच मुख्य नायक असलेला मानव (रवींद्र) समोर बसलेल्या गगनला (अ‍ॅड. माधव भारदे) पल्लेदार संवाद ऐकवून प्रभावित करतो. मानवच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या काही घटनांमुळे तो अविवाहित राहण्याचे ठरवतो. गगन आणि भूमी (शुभदा पटवर्धन) हे दोघेजण मानवला गुरुस्थानी मानून त्याच्या अवतीभोवती वावरताना दिसतात. मानवबद्दल बाहेर अनेक समज-गैरसमज आहेत. तो प्रचंड ज्ञानी असून वेश्यांच्या जनजागृतीसाठी काम करत असतो. एकदा त्याला शारीरिक अत्याचार झालेली मूकबधिर मुलगी (माणुसकी) रस्त्यात सापडते. तो तिला न्याय मिळवून देण्याचे ठरवतो. तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्यांना शोधून देऊन तो तक्रार दाखल करतो. यामध्ये त्याला वकील मित्र असलेल्या सन्मित्रची (रियाज पठाण) मोठी मदत होते. दरम्यान, त्याने पकडून दिलेल्या तिघा आरोपींच्या म्होरक्यांकडून त्याला धमक्या दिल्या जातात. तक्रार मागे घ्यावी म्हणून दबाव टाकला जातो. परंतु धार्मिकतेचे पांघरून घेऊन धमकावणाऱ्या त्या भिन्न धर्माच्या म्होरक्यांना त्यांच्याच धर्माचे दाखले देऊन मानव निरुत्तर करतो.

Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे 'मर्म'
Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे ‘मर्म’

शेवटी मानवमुळे त्या आरोपींना शिक्षा (Drama)

अवश्य वाचा : टंचाईग्रस्त नागलवाडीत पाणीच पाणी; जलयुक्त शिवारने केली किमया

शेवटी मानवमुळे त्या आरोपींना कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाते. आणि माणुसकीला न्याय मिळतो. प्रा. रवींद्र काळे यांनी लेखन, दिग्दर्शन व नाटकातील पात्र या तीनही भूमिका लीलया पार पाडल्या. रियाज पठाण यांनीही दिग्दर्शन आणि सन्मित्र हे पात्र उत्तम साकारले. उमेश गोसावी व परवीन पठाण यांनी साकारलेलं नेपथ्य समर्पक होतं. वेदश्री देशमुख आणि आदेश चव्हाण यांनी उत्तम संगीत दिलं. प्रकाशयोजना (गणेश लिमकर), रंगभूषा (सोहम सैंदाने), वेशभूषा (अविनाश व बाबासाहेब डोंगरे) चांगली होती. शुभदा पटवर्धन व ॲड. माधव भारदे यांनी चांगल्या भूमिका वठवल्या. धमकी देणारे म्होरके महेश काळे, जयदेव हेंद्रे व मंगेश शिदोरे यांनी चांगले काम केले. माणुसकी (हर्षदा वाघमारे) आणि वडील (राजकुमार मोरे) छोटी पण महत्वाची भूमिका उत्कृष्टपणे बजावली.

Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे 'मर्म'
Drama : माणुसकीचा अर्थ सांगणारे ‘मर्म’

मानवच्या भूमिकेसाठी प्रा. रवींद्र काळे यांनी चांगली मेहनत घेतल्याचे जाणवले. त्यांच्या संवादांनी प्रेक्षकांच्या अनेकदा टाळ्या मिळवल्या. मात्र त्यांनी एका प्रसंगात घातलेले उलटे जॅकेट आणि एकंदरीत नाटकात वारंवार बदलेल्या निरनिराळ्या जॅकेट्सची चर्चा मात्र, प्रेक्षकांमध्ये होती. पण एकंदरीत दमदार अभिनय आणि तांत्रिक गोष्टींची मिळालेली उत्कृष्ट साथ यामुळे माणुसकी धर्माचे ‘मर्म’ प्रेक्षकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचले, असे म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here