Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल ‘आता कसं करू?’

Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल 'आता कसं करू?'

0
Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल 'आता कसं करू?'
Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल 'आता कसं करू?'

Drama : नगर : श्रद्धा असणं आणि अंधश्रद्धा (Superstition) असणं यात मोठा फरक आहे. अंधश्रद्धेत माणूस विवेक हरवून बसतो. काम सोडून देव-देव करत बसणाऱ्यांना देव कधीच पावत नाही. कर्मपूजा हीच ईश्वरपूजा, असे मानून कामात देव शोधणारे संत महात्मे आपल्याकडे होऊन गेलेत. अती देवभोळेपणाचा अट्टाहास कुटुंबातील सदस्यांना किती तापदायक ठरू शकतो? यावर प्रकाश टाकणारं धमाल विनोदी नाटक (Drama) राज्य नाट्य स्पर्धेत (State Drama Competition) रविवारी (ता.८) सादर झालं.

Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल 'आता कसं करू?'
Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल ‘आता कसं करू?’

नक्की वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान

संदीप दंडवते यांचे लेखन व दिग्दर्शन

संदीप दंडवते लिखित आणि दिग्दर्शित नाट्य मल्हार संस्थेने सादर केलेला ‘आता कसं करू’ या नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग अहिल्यानगर केंद्रावर पार पडला. नाटकाच्या पहिल्या प्रसंगापासूनच प्रेक्षक हास्य रंगात न्हाऊन निघाले. नाटकाचा पडदा उघडताच एका सर्वसामान्य घराचा नजारा समोर येतो. घरात जागोजागी अनेक देवदेवतांच्या तसबिरी लावलेल्या दिसतात. एक दाम्पत्य देव्हाऱ्यासमोर आरती करताना दिसते. नंदन (अथर्व धर्माधिकारी) हे नाटकातील मध्यवर्ती पात्र. त्याची आई (श्वेता पारखे) खूपच धार्मिक प्रवृत्तीची असल्यामुळे नंदन आणि त्याचे वडील (राहूल सुराणा) तिच्या अट्टाहासाला वैतागलेले असतात. पण तिला उघडउघड विरोध करण्याची हिंमत दोघातही नसते.

नंदनला मानतात देवाचा दिव्य अवतार (Drama)

आईच्या धारणेनुसार नंदन हा देवाचा दिव्य अवतार आहे. त्यामुळे नंदनचे लग्नाचे वय झाले तरी तिच्या मनात लग्नाचा विचार नसतो. पण नंदनला लग्न करायचे असल्यामुळे तो वडिलांना आईला याबाबत राजी करण्यासाठी गळ घालतो. वडीलांचे आईसमोर काहीच चालत नसल्याने ते टाळाटाळ करतात. मग नंदनचा मित्र बाॅबीच्या (पवन पोटे) मदतीने एक प्लॅन बनवतो आणि वडील आईला लग्नासाठी राजी करतात. यथावकाश लग्न लागते. पूजेचा मुहूर्त २० दिवसांनी असल्याने तोपर्यंत नंदनचा त्याच्या पत्नीला स्पर्श होता कामा नये, असा सल्ला गुरुजी देतात. पण नंदन पत्नी असलेल्या अनिताच्या (अंतरा वाडेकर) सहवासासाठी तळमळत असतो. त्यांच्यावर लक्ष ठेवायला आई तिच्या भाच्याला तांदूळला (प्रदीप वाळके) बोलावून घेते. नंदन पुन्हा पुन्हा बॉबीच्या मदतीने प्लॅन बनवतो आणि रात्री देवी अंगात आल्याचे सांगून दोघेच देवदर्शनाच्या बहाण्याने बाहेर पडतात आणि तिथल्या लॉजवर थांबतात. ते परत येतात तेव्हा नंदनच्या घरी दिव्य दरबार भरलेला असतो. आलेली भक्तमंडळी नंदनला त्यांची गाऱ्हाणी सांगतात तर वडील दानपेटी घेऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. दरम्यान, नंदन दिव्यपुरुष असल्याचे समजून अनिता त्याला स्पर्श करून देत नाही. त्यामुळे नंदन वैतागलेला असतो.

Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल 'आता कसं करू?'
Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल ‘आता कसं करू?’

एके दिवशी निमिशा (सौंदर्या भोज) नावाची तरुणी नंदनच्या घरी सेवा करण्यासाठी येते. तिच्या अचानक येण्याने गोंधळलेली आई तिला घरी घेण्याचे टाळते. पण आईला आणि अनिताला जळवण्याची ही नामी संधी असल्याने नंदन तिला सेवेसाठी घरी थांबवतो. बॉबी आणि नंदन तांदुळला देखील त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतात. हे सर्वकाही देव करत असल्याचे तो सांगतो. नंदन मुद्दामहून निमिशासोबत लगट करत असतो. त्यामुळे आईची आणि अनिताची तगमग होत असते. शेवटी वैतागून नंदन आईला हे सर्व काही नाटक असल्याचे सांगतो. आई आणि अनिताला त्यांची चूक उमगते. दरम्यान निमिशा ही भक्तीण नसून पत्रकार असल्याचे आणि नंदनचा पर्दाफाश करण्यासाठी आल्याचे सांगते आणि सर्वांना धक्का बसतो. पण ती असं काही करणार नसल्याचे सांगते. शेवटी सर्वजण नंदन आणि अनिताला एकांत देतात आणि नाटकाचा गोड शेवट होतो. ‘

Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल 'आता कसं करू?'
Drama : हास्याचे फवारे अन् हाऊसफुल्ल ‘आता कसं करू?’


नंदनच्या भूमिकेला अथर्वने चांगला न्याय दिला. वडिलांची भूमिका करताना राहूल सुराणा यांचा कायिक आणि वाचिक अभिनय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. श्वेता पारखे हिने देवभोळ्या आईच्या पात्राला साजेसा अभिनय केला. पवनच्या बॉबी या पात्राने नाटकात चांगलीच रंगत आणली. प्रदीप वाळकेच्या तांदूळ पात्राने प्रेक्षकांना लोटपोट हसवले. त्याच्या अभिनयाने विनोदी अभिनेते भालचंद्र कदम यांची आठवण झाली. सौंदर्या भोज (निमिशा), अंतरा वाडेकर (अनिता) आणि इतर कलाकारांनी उत्तम अभिनय केला.    
संदीप दंडवते यांनी दिग्दर्शनाची भूमिका यशस्वी पेलली. प्रकाश योजना (ऋतुराज दंडवते), संगीत (आशुतोष निमसे), नेपथ्य (अंजना मोरे, प्रमोद जगताप), रंगभूषा (रितेश डेंगळे), वेशभूषा (गौरी देशपांडे), रंगमंच व्यवस्था (समर्थ जोशी, संकेत आभाने) यांनी पहिली. प्रकाशयोजना अजून प्रभावी करता आली असती. नंदनच्या अंगात देवी आली असुनही भक्तजणांनी केलेला ‘कृष्णा’चा जप विसंगत वाटला.

हास्यकल्लोळात रंगलेल्या प्रयोगाच्या शेवटच्या गंभीर संवादांनी सभागृहात काहीवेळ ‘पिनड्रॉप सायलेन्स’ पसरला होता. ‘अति देवभोळेपणाच्या नादात आपण आपले कर्तव्य विसरायला नको. कुठलीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या पातळीवर घासून पाहणे, तपासून पाहणे खूप गरजेचं असतं’. असा संदेश विनोदी अंगाने मांडण्यात आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले, असे म्हणता येईल.