Drama : दिग्दर्शनात फसलेलं ‘रिप्लेसमेंट’

Drama : दिग्दर्शनात फसलेलं 'रिप्लेसमेंट'

0
Drama : दिग्दर्शनात फसलेलं 'रिप्लेसमेंट'
Drama : दिग्दर्शनात फसलेलं 'रिप्लेसमेंट'

Drama : नगर : एखाद्या कुटुंबातील (Family) वारलेल्या स्त्रीची जागा एक अनामिक स्त्री अनाहूतपणे घेते. सुरुवातीला राग-राग करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना ती आपल्या वागणुकीने जिंकून घेते. तिने लावलेल्या लळ्यामुळे तिचा गंभीर अपराध (Serious Crimes) देखील माफ केला जातो. आणि तिला सर्वजण आपलेसे करतात. तुमचा हेतू शुद्ध असेल तर तुम्ही आपुलकीने सर्वांना जिंकून घेऊ शकता, असा संदेश ‘रिप्लेसमेंट’ या नाटकाने (Drama) दिला. 

Drama : दिग्दर्शनात फसलेलं 'रिप्लेसमेंट'
Drama : दिग्दर्शनात फसलेलं ‘रिप्लेसमेंट’

नक्की वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान

शाळकरी नात यांच्या संवादाने नाटकाची सुरुवात

राज्यनाट्य स्पर्धेत सोमवारी (ता.९) प्रशांत सूर्यवंशी लिखित आणि दिग्दर्शित राहुरीच्या नटेश्वर कला व क्रीडा मंडळाने ‘रिप्लेसमेंट’ हे नाटक अहिल्यानगर केंद्रावर सादर केले. एका शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या मॅडम (शुभांगी त्रिभुवन), त्यांचे रिटायर पती असलेले साहेब (प्रशांत सूर्यवंशी) आणि त्यांची शाळकरी नात यांच्या संवादाने नाटकाची सुरुवात होते. त्यांचा डॉक्टर असलेला मुलगा गौतम सध्या ऑस्ट्रेलियात असून त्यांची सून काही वर्षांपूर्वी वारलेली असते. शाळेच्या लगबगीत असलेल्या त्यांच्या नातीचा म्हणजेच विभाचा (भैरवी केळकर) जिना उतरताना पाय मोडतो. आणि तेव्हापासून एक स्त्री (प्राची बधे) आपण विभाची आई असल्याच्या अविर्भावात त्यांच्या घरात वावरू लागते. घरातल्यांच्या आवडीनिवडी आणि इतर कामे ती हुबेहूब पहिल्या सुनेसारख्या निभावते. परंतु ती आपली खरी सून नसल्याचे साहेब आणि मॅडमला माहीत असल्याने ते पोलिसात तक्रार करतात.

Drama : दिग्दर्शनात फसलेलं 'रिप्लेसमेंट'
Drama : दिग्दर्शनात फसलेलं ‘रिप्लेसमेंट’

नक्की वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलगा जखमी

पोलीस तक्रारही मागे घेऊन नाटकाचा गोड शेवट (Drama)

दरम्यान, त्या तोतया सुनेबद्दल उत्सुकता वाढल्याने शेजारच्या सुगंधा काकू (अनुष्का कोरडे) आणि डॉक्टरांवर एकतर्फी प्रेम करणारी जुनी मैत्रीण डॉ. मैथिली (पूजा कुमावत) घरी येऊन चौकशी करून जातात. आई वडिलांचा मुलावर संशय असून त्यानेच त्या मुलीला पाठवले, असा त्यांचा समज होतो. डॉ. गौतम घरी परतल्यावर त्या मुलीला सत्य विचारतो आणि ती शेवटी आपण एक कॉलेज कुमारी असल्याची कबुली देते. वारलेल्या पत्नीच्या हरवलेल्या सुटकेसमधील वस्तूंमुळे घरातली तुमच्या सगळी माहिती मिळाली. पण मुलीच्या काळजीपोटी इथे राहिल्याचे ती सांगते. शेवटी तिला सर्वजण डॉ. गौतमची पत्नी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतात आणि पोलीस तक्रारही मागे घेऊन नाटकाचा गोड शेवट होतो. 

Drama : दिग्दर्शनात फसलेलं 'रिप्लेसमेंट'
Drama : दिग्दर्शनात फसलेलं ‘रिप्लेसमेंट’


इतर पात्रांच्या तुलनेत प्राची बधे यांनी तोतया सुनेचं पात्र चांगलं साकारलं. त्यांनीच नाटक शेवटपर्यंत नेलं, असं म्हणता येईल. बाकीच्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. अपुऱ्या पाठांतरामुळे दिग्दर्शक व साहेबांच्या भूमिकेतील प्रशांत सूर्यवंशी, घरात आलेली डॉक्टरची मैत्रीण, काही प्रसंगात सासू व पोलीस अधिकारी रंगमंचावर चाचपडताना दिसले. काकूच्या भूमिकेतील अनुष्का कोरडे व विभा साकारणाऱ्या भैरवी केळकर या चिमुकलीने समाधानकारक काम केले. 


नेपथ्य (दत्तात्रय साळवे), प्रकाश योजना (संजय वाणी), संगीत (सई सूर्यवंशी), रंगभूषा (विशाल तागड), वेशभूषा (विजय साळवे), रंगमंच व्यवस्था (सविता खळेकर) यांनी पहिली. रंगभूषा आणि प्रकाशयोजनेवर अजून काम करणं आवश्यक होतं. प्रशांत सूर्यवंशी यांचे तिहेरी जबाबदाऱ्यांच्या नादात दिग्दर्शन आणि अभिनयाकडे सपशेल दुर्लक्ष झाले. नाटकाच्या रंगमंचावर वावरताना कलाकारांनी प्रेक्षकांकडे पाठ करुन संवाद बोलू नयेत, एवढा साधा संकेत नाटक दरम्यान, पाळला गेला नाही. चांगली संहिता असूनही सादरीकरणात चुका झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. परंतु नाटकाच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले, असे म्हणता येईल.