Drama Competition | नगर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचनालाय आयोजित राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा (Drama Competition) अहिल्यानगर (Ahilyanagar) केंद्राच्या स्पर्धांना २५ तारखेपासून सुरुवात होत आहे. २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत माऊली सभागृहात ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत १७ नाट्य संस्था सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेच्या सम्वयक पदी सागर मेहेत्रे तर सह समन्वयक पदी जालिंदर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
नक्की वाचा : दहावीच्या परीक्षेत गणित,विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी ‘इतके’ गुण आवश्यक
प्रेक्षकांना आवाहन (Drama Competition)
सातत्याने ६३ वर्षे चालणारी ही स्पर्धा आहे. दिवसाला एक नाट्य प्रयोग होणार असून रोज सायंकाळी ८ वाजता नाट्य प्रयोग सादर होणार आहे. नाममात्र दरामध्ये जिल्ह्यातील कलावंतांची कला पाहण्यासाठी मिळणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
अवश्य वाचा : राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत : आमदार बच्चू कडू
सादर होणारी नाटके (Drama Competition)
२५ सप्टेंबर – जन पळभर म्हणतील टिंब टिंब (विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण)
२६ सप्टेंबर – ती, तिचा दादला आणि मधला (वात्सल्य प्रतिष्ठान, अहिल्यानगर)
२७ सप्टेंबर – प्रियांका आणि दोन चोर (स्व. गिरधारीलाल चौधरी अभिनव ग्राम प्रबोधिनी, अहिल्यानगर)
२९ सप्टेंबर – ब्लॅक अँड व्हाईट (स्माईल फाउंडेशन, श्रीरामपूर)
३० सप्टेंबर – कधी आंबट कधी गोड (संकल्पना फाउंडेशन, कोपरगाव)
१ डिसेंबर – पंचमवेद (सप्तरंग थिएटर्स, अहिल्यानगर)
२ डिसेंबर – राजर्षी (संगम ग्रामविकास मंडळ, संगमनेर)
३ डिसेंबर – दुसरा अंक (समर्थ युवा प्रतिष्ठान, घोडेगाव)
४ डिसेंबर – मर्म (रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान, वडगाव गुप्ता)
५ डिसेंबर – उत्खनन (प्रवरा थिएटर्स व एफ. के. क्रिएटिव्ह क्रिएशन्स, शेवगाव)
६ डिसेंबर – कन्यादान (नाट्याराधना, अहिल्यानगर)
८ डिसेंबर – आता कसं करू? (नाट्य मल्हार प्रतिष्ठान, अहिल्यानगर)
९ डिसेंबर – रिप्लेसमेंट (नटेश्वर कला व क्रीडा मंडळ, राहुरी फॅक्टरी ता. राहुरी)
१० डिसेंबर – बस्स… इतकंच (कर्णेज अॅकॅडमी, श्रीरामपूर)
११ डिसेंबर – अमाशी (कल्पद्रुम फाउंडेशन, अहिल्यानगर)
१२ डिसेंबर – झिम पोरी झिम (जय बजरंग युवा सांस्कृतिक, क्रीडा, ग्रामीण शैक्षणिक मंडळ, अहिल्यानगर)
१३ डिसेंबर – आकाशदिठी (केक फाउंडेशन, अहिल्यानगर)