Drama Competition : आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन; हायजीन फर्स्ट व आय लव्ह नगर यांचा उपक्रम

Drama Competition : आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन; हायजीन फर्स्ट व आय लव्ह नगर यांचा उपक्रम

0
Drama Competition : आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन; हायजीन फर्स्ट व आय लव्ह नगर यांचा उपक्रम
Drama Competition : आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन; हायजीन फर्स्ट व आय लव्ह नगर यांचा उपक्रम

Drama Competition : नगर : नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ व निर्जंतुक अन्न पदार्थांचे महत्व समजून अधिक जनजागृती होण्यासाठी ‘हायजीन फर्स्ट’ (Hygiene first) ‘आय लव्ह नगर’ (I Love Nagar) या संस्थेच्यावतीने अहिल्यानगर शहरात अन्नसुरक्षा जनजागृती आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन (Inter-School Drama Competition) करण्यात आले आहे, अशी माहिती हायजीन फर्स्टच्या सदस्या वैशाली मुनोत यांनी दिली आहे.

नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

२१ जून ते १ जुलै दरम्यान नावनोंदणी आवश्यक

या स्पर्धेसाठी २१ जून ते १ जुलै या दरम्यान नावनोंदणी करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा ता. ९ ते १५ जुलै या दरम्यान अहिल्यानगर मधील विविध शाळांमध्ये होणार आहे. जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभगी होऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ व निर्जंतुक अन्न पदार्थांच्या जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे. या स्पर्धेत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी गूगल फॉर्म द्वारे नावनोंदणी आवश्यक असून नोंदणी झालेल्या शाळांमध्ये ९ ते १५ जुलै या कालावधीत स्लॉटनुसार विद्यार्थ्यांना शाळांमध्ये नाट्य सादर करता येईल यासाठी परीक्षक शाळांमध्ये जाऊन नाटकाचे व शाळेचे परिक्षण करतील.

अवश्य वाचा : माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष

५ ते १० विद्यार्थ्यांचा संघ नाट्य सादर करू शकतो (Drama Competition)

या स्पर्धेत कमीतकमी ५ व जास्तीत जास्त १० विद्यार्थ्यांचा संघ नाट्य सादर करू शकतो. सर्वोत्तम सादरीकरण करणाऱ्या संघाला व सर्वात स्वच्छ शाळेला आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी स्वच्छतेविषयी निकष व हायजिन फर्स्ट संस्थेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ९४२००२८२१२, व ९२८४७९७६१६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.