Dress Code: मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य 

आता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले. तसेच शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टि’ संबोधन लावण्याची सूचना ही देण्यात आली आहे.

0
Dress Code
Dress Code

नगर : नुकतीच राज्यात शिक्षकांची भरती (Shikshak Bharati) करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) दिले. तसेच शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टि’ संबोधन लावण्याची सूचना ही देण्यात आली आहे.

नक्की वाचा : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल  

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात. जनमानसात त्यांच्याकडे गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. शिक्षकांचा संबंध विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. त्यामुळे अध्यापनाचे काम करताना आपला पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल, याची काळजी घेणे अभिप्रेत आहे. शिक्षकाचा पेहराव अशोभनीय, अव्यवस्थित आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, तसेच विद्यार्थ्यांवर होतो असे नमूद करून शिक्षकांच्या पेहरावासंदर्भातील मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शिक्षकांनी कोणता पेहराव करावा ? (Dress Code)

महिला शिक्षकांनी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा. शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेसकोड, परिधान करायच्या पेहरावाचा रंग निश्चित करावा, पेहरावाला शोभतील अशी पादत्राणे असावीत, वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असे नमूद करण्यात आले आहे. शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टि’ संबोधन लावण्यात यावे, या संदर्भातील बोधचिन्ह शिक्षण आयुक्त यांनी निश्चित करावे, हे संबोधन आणि बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही पहा : अभिनेत्री स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला ‘कासरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चुकीचा पेहराव नको ( Dress Code)

शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स, टीशर्ट परिधान करू नये, असे नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here