
DRI Gold Racket : मुंबईत (Mumbai) सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश (Gold Smuggling Racket) करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) मोठं यश आले आहे. ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ (Operation Bullion Blaze)अंतर्गत मुंबईत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११. ८८ किलो सोनं, ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे असल्याची माहिती आहे. या सोबतच ८.७७ किलो चांदी देखील जप्त करण्यात आली आहे.
परदेशातून तस्करी करून आणलेले सोने गुप्त भट्ट्यांमध्ये वितळवून स्थानिक बाजारपेठेत विकले जात असल्याची माहिती डीआरआयच्या तपासात समोर आली आहे. डीआरआयने दोन अवैध वितळवणी युनिट्सवरही छापे टाकले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा आणि तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
नक्की वाचा: ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
“ऑपरेशन बुलियन ब्लेझ” अंतर्गत कारवाई (DRI Gold Racket)
“ऑपरेशन बुलियन ब्लेझ” अंतर्गत केलेल्या या कारवाईत तस्करी केलेले सोने स्वीकारणे आणि वितळवलेले सोन्याचे बार स्थानिक खरेदीदारांना विकणे या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन दुकानांवर छापे टाकण्यात आलेत. त्यापैकी एका दुकानातून ५. ५३ किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ११. ८८ किलो (२४ कॅरेट) सोने ज्याची किंमत अंदाजे ₹ १५.०५कोटी रुपये आहे आणि ८.७२ किलो चांदी जप्त करण्यात आली. सर्व मालमत्ता कस्टम्स अॅक्ट, १९६२ अंतर्गत जप्त करण्यात आली आहे.
अवश्य वाचा: …तर अजित पवार राजीनामा देतील – माणिकराव कोकाटे
सरकारी महसूल फसवण्याच्या उद्देशाने टोळी कार्यरत? (DRI Gold Racket)
या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबईतील माननीय दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासातून असे स्पष्ट झाले आहे की, ही टोळी भारताच्या सोन्याच्या आयात धोरणाचे उल्लंघन करून, सरकारी महसूल फसविण्याच्या उद्देशाने कार्यरत होती.


