Drinking Water : अकोले : तालुक्यातील कोहंडी येथे पिण्याच्या पाण्याच्या (Drinking Water) मागणीसाठी लहान मुलांसह संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले (Locked). दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे (Sunita Bhangre) यांना समजताच त्यांनी तत्काळ कोहंडी गावात येत गटविकास अधिकार्यांशी संपर्क साधत त्यांच्या कानावर महिला व ग्रामस्थांच्या भावना टाकल्या. त्यानंतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नक्की वाचा: नाशिकमध्ये चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून झाडाझडती
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
एक महिन्यापासून कोहंडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिणामी नागरिकांना विहिरीतील खराब पाणी प्यावे लागत आहे. जवळच एक किलोमीटरवर निळवंडे धरणाचा बॅकवॉटर असताना आजही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. त्यामुळे धरण उशाला व कोरड घशाला असे विदारक चित्र बहुतांश गावांत दिसून येत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील आदिवासी भागातील ही सत्य परिस्थिती पाहताना पुढारी आणि अधिकार्यांच्या संवेदना जातात कुठे हे समजत नाही? असा संतप्त सवाल येथील महिला करत होत्या. आम्ही काय मागतो तर स्वच्छ पाणी, तेही देण्यास जर एक महिना लागत असेल तर नेमके काय समजायचे. आदिवासी भागातील लोक हे खूप स्वाभिमानी असून त्यांचा उद्रेक झाला तर पळता भुई थोडी होईल, हे प्रशासन आणि पदाधिकार्यांनी समजून घ्यावे, असा इशाराही येथील महिलांनी दिला. सदर प्रकार माहित झाल्यानंतर अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे गावात पोहचल्या. कोणत्याही परिस्थितीत आत्ताच्या आत्ता महिलांना पाणी मिळाले पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी गटविकास अधिकार्यांकडे यासंदर्भात तक्रार केली असता माझ्याकडे याबाबत तक्रारी येत नाहीत, असे गटविकास अधिकार्यांनी भांगरे यांना सांगितले.
हे देखील वाचा: शांतीगिरी महाराजांचा नाशिकमध्ये हटके प्रचार
हक्काचे पाणी देण्याची मागणी (Drinking Water)
आम्हांला आमच्या हक्काचे पाणी द्या. आमचे पाणी जायकवाडीपर्यंत जाते, शेतीला जाते, उद्योग व्यवसायांना जाते. मात्र आम्हांला प्यायला पाणी नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील महिलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.