Driving License : ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही; काय आहे नवीन नियम

येत्या १ जूनपासून लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये न जाता तुम्ही घेत असलेल्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देऊन लायसन्स मिळवू शकता.

0
Driving License
Driving License

नगर : वाहन चालविण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढण्यासाठी आत्तापर्यंत आरटीओ जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु, आता आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम एक जूनपासून लागू होणार आहे. 

नक्की वाचा : यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!

लायसन्स लवकरच मिळवता येणार

भारतात वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. वाहन परिवहन विभागातर्फे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. यासाठी जवळच्या आरटीओमध्ये तुम्हाला अर्ज सादर करून लायसन्ससाठी अप्लाय करावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केल्यानंतर लायसन्स हातात मिळेपर्यंत बराच काळ जातो. मात्र, आता नव्या नियमानुसार हे लायसन्स तुम्हाला लवकर मिळवता येणार आहे. 

Driving License
Driving License

येत्या १ जूनपासून सुरूवात (Driving License)

येत्या १ जूनपासून लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये न जाता तुम्ही घेत असलेल्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देऊन लायसन्स मिळवू शकता. यासाठी ठरावीक संस्थांना रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

Driving License
Driving License

अवश्य वाचा : ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे  

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नवे नियम काय आहेत?

– ड्रायव्हिंग करणारा प्रशिक्षक हा किमान १२ वी उत्तीर्ण असावा.

– ड्रायव्हिंग करत असलेल्या प्रशिक्षकाला पाच वर्षाचा अनुभव असणे महत्वाचे आहे.

– हलक्या वाहनांसाठी ४ आठवडे प्रशिक्षण देण्यात येईल. तर अवजड वाहनांसाठी ६ आठवडे प्रशिक्षण देण्यात येईल.

– लायसन्स काढण्यासाठी लागणारा प्रक्रिया काळ कमी करण्यात आला आहे.

– वाहनाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी https://parivahan.gov.in/. या संकेतस्थळाला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here