Pune Rain:पुण्यात पावसाची रिमझीम;या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह परिसरात आज रिमझिम पावसाने हजेरी लावली.

0
Pune Rain Updates: पुण्यात पावसाची रिमझीम;या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
Pune Rain Updates: पुण्यात पावसाची रिमझीम;या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Pune Rain Updates : मागील दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने विश्रांती (Rain Update) घेतली आहे. मात्र आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र दिसून येत आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) देण्यात आला आहे. पुण्यासह (Pune Rain) परिसरात आज रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

नक्की वाचा : प्राजक्ता माळीची चाहत्यांना वाढदिवसाची भेट,’फुलवंती’ची रिलीज डेट जाहीर

पुण्यासह सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारी (Pune Rain)

पुण्यासह घाटमाथा परिसरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी आलाय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या ठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, सातारा जिल्ह्यातही घाट माथ्यावर मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अवश्य वाचा : “आई कुस्ती जिंकली, मी हरलेय”…ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला रामराम

पुण्यात धरणक्षेत्रातील पाऊस ओसरला  (Pune Rain)


पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून येत आहे. सध्या मुळशी, टेमघर, वडिवळे या धरणक्षेत्रांत आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. शहराला तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात कोसळणारा पाऊस आता ओसरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here