Drowned : पारनेर: तालुक्यातील मांडओहोळ जलाशयात (Mandohol Dam) रविवारी (ता.१९) दुपारी दोन तरुण बुडाले (Drowned). दोघांपैकी एकाचा मृतदेह (Dead Body) पाण्यातून रविवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. अखेर आज सोमवारी (ता.२०) सकाळी नऊच्या दरम्यान दुसरा मृतदेह सापडला. नगर शहरातील नगर-कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर भागातील सहा मुले दुचाकीवरून मांडओहोळ जलाशयात फिरण्यासाठी गेले होते.
हे देखील वाचा: मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल
दोन्हीही मृतदेह सापडले
अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १८, रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रस्ता, नगर), सौरभ नरेश मच्छा (१८, रा. नगर) ही दोन मुले मांडओहोळ जलाशयात बुडाले. प्रशासनाच्या प्रयत्नाने दोन्हीही मृतदेह आता सापडले आहेत.
नक्की वाचा: सैन्य दलातील नायक सानप यांना अखेरचा निरोप
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले (Drowned)
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी अथर्व श्रीनिवास श्रीराम, सौरभ नरेश मच्छा, चैतन्य बालाजी सापा, आकाश अनिल हुंदाडे, जीवन दिनेश पाटील, अभिलाष रघुनाथ सुरम हे सहा जण दुचाकीवरून निघोज येथून मांडओहोळ जलाशयात पोहोचले. दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अथर्व श्रीराम, सौरभ मच्छा पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्यानंतर इतर मित्रांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक आले. तसेच ही माहिती समजल्यावर सरपंच प्रकाश गाजरे व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. त्यांनी अथर्व श्रीरामला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सौरभ मच्छा हा पाण्यातच होता. त्याचाही शोध प्रशासनाकडून सुरू होता. सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान त्याचाही मृतदेह पाण्याच्यावर तरंगलेला दिसून आला. पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या सर्व मदतकार्यामध्ये म्हसोबा झाप गुरेवाडी परिसरातील अजय वाघ, विक्रम वाघ, रवींद्र वाघ, अविनाश वाघ, जिगर माळी, अर्जुन वाघ, दीपक वाघ, दादाभाऊ वाघ, अमोल वाघ या आदिवासी तरुणांनी प्रशासनाला मदत केली.