Drugs | अकोले: येथील मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलमध्ये अमली पदार्थांचे (Drugs) दुष्परिणाम याविषयी सत्र आयोजित करण्यात आले होते. डॉ. प्रतीक घोडके यांनी अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. व्यसनामुळे आरोग्य, शिक्षण आणि कुटुंब व्यवस्था यावर होणारे घातक परिणाम त्यांनी उदाहरणांसह त्यांनी सांगितले. युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.
अवश्य वाचा- उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडून महापालिका रुग्णालयाची अचानक पाहणी (Drugs)
अमली पदार्थ तोंडाचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही नष्ट करतात
तसेच शारीरिक परिणाम जसे की तंबाखू आणि सिगारेटमुळे तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसांचे आजार आणि हृदयविकार होतात. दारूमुळे यकृत निकामी होऊ शकते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते,असे त्यांनी सांगितले. प्राचार्या अल्फोन्सा डी. यांनीही विद्यार्थ्यांना अमली पदार्थ तोंडाचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही नष्ट करतात. त्यामुळे नियमित दंत तपासणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्त जीवन अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.
नक्की वाचा- बांगलादेशी कामगार आढळल्यास कामावर ठेवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई (Drugs)
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “अमली पदार्थांना सेवन करणार नाही आणि इतरांनाही त्यापासून दूर राहण्यास प्रेरित करीन” अशी प्रतिज्ञा घेतली. या सत्रासाठी नयना घोडके, समुपदेशिका आरती जाधव, पर्यवेक्षक पराग सानप व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उषा हासे यांनी करून शेवटी आभार मानले.



