Dry Day : मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Dry Day : मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस 'ड्राय डे', जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

0
Dry Day
xr:d:DAF5Y3epXKI:898,j:7474147495277028390,t:24040512

Dry Day नगर : सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम सुरू आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) कडक पावले उचलली आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दारू विक्रीसंदर्भात (Dry Day) आदेश दिले आहे.

हे देखील वाचा: ज्यांनी दादांची साथ सोडली, ते जनतेची साथ काय देणार; राधाकृष्ण विखेंची लंकेंवर टीका

४ दिवस ड्राय डे (Dry Day)

नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. नगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील ५ किलोमीटर क्षेत्रासाठी कोरडा दिवस अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

Dry Day
xr:d:DAF5Y3epXKI:896,j:2752123289224681981,t:24040512

नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश

सर्व प्रकाराच्या मद्य विक्रीची दुकाने बंद (Dry Day)

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. दिंडोरी (नाशिक), नाशिक, भिवंडी (ठाणे) या लोकसभा मतदार संघातील मतदानाचा दिवस २० मे २०२४ आहे. बारामती (पुणे), उस्मानाबाद, माढा (सोलापूर) या लोकसभा मतदार संघातील मतदानाचा दिवस ७ मे असल्यामुळे या मतदार संघाच्या सीमेलगत नगर जिल्ह्यातील ५ किलोमीटर अंतरावर कोरडा दिवस लागू असल्याचा आदेशही नगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या ५ किलोमीटर अंतरावर सर्व प्रकाराच्या मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील.

नगर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जालना, औरंगाबाद, शिरूर (पुणे), बीड या लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीचा मतदानाचा दिवस १३ मे २०२४ असल्याने त्यादिवशी कोरडा दिवस ठेवण्याचा आदेश त्या लोकसभा मतदार संघातील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे नगर जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा आदेश जारी केलेला नाही.

सर्व दारू विक्रेत्यांनी आपले दुकानातील देशी व ‍विदेशी, इतर अनुज्ञप्त्या असलेल्या दारूची विक्री मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस बंद ठेवावी. असे ही आदेशात नमूद आहे.


या कार्यक्षेत्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक क्र.१ व क्र.२ यांनी मद्याची विक्री, वाहतूक व दुकाने उघड्या राहणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीचा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. अशा सूचनाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांच्या आदेशात दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here