Dunki Movie Song : ‘डंकी’ सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांच्या डंकी या सिनेमातील 'लुट पूट गया' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

0
'डंकी' सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित

नगर : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या डंकी (Dunki) या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. आता या सिनेमातील ‘लुट पूट गया’ (Lutt Putt Gaya) हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शाहरुख खान २०२३ मध्ये ‘डंकी’च्या माध्यमातून तिसऱ्यांदा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. वर्षाच्या शेवटी किंग खानचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नक्की वाचा : जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाले संगणक भेट 

‘डंकी’ सिनेमातील ‘लुट पूट गया’ या पहिल्या गाण्यात शाहरुख खान, अभिनेत्री तापसी पन्नूची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही तरुण दिसत आहेत. किंग खान आणि तापसी पन्नूच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शाहरुखने ‘डंकी’ या सिनेमाच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : आयसीसीचा नवा नियम ; गोलंदाजांनाही ‘टाईमआउट’

शाहरुखचा ‘डंकी’ या सिनेमात तापसी पन्नू आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाला U सर्टिफिकेट मिळाले आहे. ‘डंकी’ या सिनेमात शाहरुख आणि तापसीसह विकी कौशल, बोमन ईरानी, आणि सलमान खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा बहुचर्चित सिनेमा २१ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here