Dunki Trailer Out : शाहरुख खानच्या ‘डंकी’चा ट्रेलर प्रदर्शित;’या’ दिवशी येणार सिनेमा 

नगर : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' (Dunki Trailer Out) या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.

0
शाहरुख खानच्या 'डंकी'चा ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी येणार सिनेमा

नगर : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. आता किंग खान त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ (Dunki Trailer Out) या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.

नक्की वाचा : अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ ची तारीख आली समोर

शाहरुख खानने ‘डंकी’ या सिनेमाचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत त्याने लिहिलंय की, “हा प्रवास मी लालटूहून सुरू केला होता. आता याचा शेवटही माझ्या खास मित्रांसोबत मी करणार. ‘डंकी’ चा ट्रेलर एक प्रवास दाखवणारा आहे. वेड्या मित्रांची मजेशीर गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल. विनोदासह कुटुंबासोबतच्या जुन्या आठवणी तुम्हाला आठवतील. प्रतीक्षा संपली #DunkiDrop4 – रिलीज. ‘डंकी’ २१ डिसेंबर २०२३ रोजी जगभरातील सिनेमागृहात होणार प्रदर्शित”.

हेही वाचा : अखेर भिडेवाडा झाला इतिहासजमा ; महापालिकेकडून कारवाई 

‘डंकी’ या सिनेमाचा ट्रेलर ३ मिनिटे २ सेकंदाचा आहे. या सिनेमाच्या सुरुवातीला हार्डी म्हणजेच शाहरुख खान आपली गोष्ट सांगताना दिसत आहे. लालटूमध्ये १९९५ मध्ये घडलेल्या घटनेवर तो भाष्य करतानादिसत आहे. विनोद,भावना आणि अभिनय यांचे मिश्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लंडनला जाण्याची इच्छा असणाऱ्या मित्रांची ही गोष्ट आहे. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तर तापसी पन्नू, बोमन ईरानी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिला ढिल्लो यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. तर गौरी खान, जियो स्टूडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. डंकी’चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता हा सिनेमा २१ डिसेंबर २०२३ला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here