Dutt Jayanti : नेवासा : तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्त पीठ देवगड येथे श्री दत्तजयंती (Dutt Jayanti) महोत्सवास बुधवारी (ता.२०) संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. यावेळी कालीपुत्र श्री कालीचरणजी महाराज (Kalicharan Maharaj) यांनी गायलेल्या शिव तांडव स्त्रोताने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या दत्त नामाच्या जयघोषाने देवगड नगरी (Devgad Datta Mandir Devasthan) दुमदुमली होती.
हे देखील वाचा : साेयाबीन, कापूस प्रश्नी चर्चा फिसकटली; रविकांत तुपकरांचे आता गनिमी काव्याचे आंदाेलन
श्री दत्तजयंती महोत्सवाच्या प्रारंभ प्रसंगीच भारताच्या कानाकोपऱ्यातील मठामधील संत महंतांचे आगमन देवगड नगरीत झाले. यावेळी त्यांचे श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी स्वागत केले. हरियाणा येथील कालिदास मठाचे महंत श्री श्री श्री १००८ परमहंस कृष्णानंद कालीदासबाबाजी हरियाणा, कर्नाटक येथील शंकराचार्य अभिनव विद्या नृसिंह भारतीजी महाराज, विदर्भातील रामानंदाचार्य राम राजेश्वराचार्य माऊली सरकार, द्वारकापीठ येथील सुर्याचार्य कृष्णदेवनंद गिरीजी महाराज, कालीपुत्र श्री कालीचरणजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी ऋषिनाथजी महाराज या संत महंतांचा देवगड भेटीत समावेश होता.
“श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय”अवधूत चिंतन श्री गुरुदेव असा जयघोष यावेळी केला. या सर्व संत महंतांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वर, कार्तिक स्वामी, श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे वस्त्र देऊन व पुष्पहार घालून संतपूजन करण्यात आले. मराठवाडा येथील देवगड भक्त मंडळाचे सेवेकरी बजरंग विधाते यांनी देवगड क्षेत्र स्थान महिमा याबद्दल उपस्थित संत महंतांना माहिती दिली.
नक्की वाचा : आता नगरमध्ये लवकरच एमआयडीसीची उभारणी; सुजय विखे पाटील
याप्रसंगी पारायण व्यासपीठ नेतृत्व करणारे नारायण महाराज ससे, संजय महाराज निथळे, देवगडचे संत सेवक बाळकृष्ण महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संतसेवक बाळासाहेब पाटील, ज्ञानदेव लोखंडे, रामजी विधाते, रवींद्र मुनोत, बद्रीनाथ फोलाणे, सरपंच अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे,अशोक गाडेकर, विश्व हिंदू परिषदेचे डॉ.अविनाश काळे, प्रशांत बहिरट, विवेक शिंदे, सार्थक परदेशी, आकाश गायकवाड, प्रताप चिंधे, गणेश मुरदरे, बजरंग दलाचे यश कदम यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान दत्तजयंती उत्सव शुभारंभ प्रसंगी पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रयांसह संत किसनगिरी बाबांच्या मूर्तीस गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर सदगुरू किसनगिरी बाबांच्या प्रतिमेसह ग्रंथ पूजन व विना पूजन करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. दत्तजयंती जयंती निमित्त देवगड मंदिर परिसरातील सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांनी दत्तजयंती निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले.