E20 Petrol : आजपासून नवीन आर्थिक वर्ष (New Financial Year) सुरु होत आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दराच्या निश्चितीपासून अनेक महत्त्वाचे नियम देशभरात लागू करण्यात येणार आहेत. अशा या नियमांच्या गर्दीमध्ये वाहनधारकांवर सर्वाधिक परिणाम होणारा एक बदल १ एप्रिलपासून लागू (Change effective from April 1st) होत आहे. तो म्हणजे E20 पेट्रोलचा (E20 Petrol). हा बदल अनेक वाहनांवर सकारात्मक, तर काही वाहनांवर नकारात्मक परिणाम करताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
नक्की वाचा: अतिवृष्टीत दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत; नेमकी किती ?
E20 पेट्रोलचा बदल नेमका काय ? (E20 Petrol)
एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भारतात पेट्रोल दरांमध्ये मोठा बदल होणार आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक पेट्रोल पंपावर फक्त E20 पेट्रोलच मिळणार आहे. म्हणजेच 80% नॉर्मल पेट्रोल आणि 20% इथेनॉल असं इंधन मिळेल. पेट्रोलियम मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
अवश्य वाचा: श्रीरामपूरमध्ये जावयाचा सासऱ्याच्या दारात अघोरी प्रयोग!
इथेनॉल म्हणजे काय? (E20 Petrol)
इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे स्टार्च आणि साखरेच्या किण्वनाने म्हणजेच (फर्मेंटेशन) तयार केले जाते. ते पेट्रोलमध्ये मिसळून गाड्यांमध्ये पर्यावरणपूरक इंधन म्हणून वापरले जाते. इथेनॉलचे उत्पादन प्रामुख्याने उसाच्या रसापासून होते, परंतु स्टार्चयुक्त पदार्थ जसे की मका, सडलेले बटाटे, कसावा आणि सडलेल्या भाज्यांपासूनही इथेनॉल तयार केले जाऊ शकते. ऊस आणि धान्यांपासून हे इंधन बनवलं जातं. या इंधनाचे अनेक फायदे असले तरीही त्याचा काही वाहनांवर विपरित परिणाम देखील होताना पाहायला मिळालं आहे.
या इंधनाच्या फायद्यांविषयी सांगायच झालं तर, प्रदूषण कमी होईल आणि भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. भारताचा परदेशातून तेल खरेदी करण्याचा खर्च वाचेल हे सर्व खरं. मात्र, जर तुमचं वाहन 2023 पूर्वीचं असेल, तर या 20% इथेनॉलचा इंजिनवर जास्त ताण पडू शकतो. ज्यामुळे गाडीचं मायलेज कमी होईल आणि इंजिनमधील रबरचे पार्ट्स लवकर खराब होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जुन्या वाहनांचं मायलेज साधारण 3 ते 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तर, इथेनॉलमुळं रबर पार्टसमवेत इंधनाचा पाईपसुद्धा खराब होऊ शकतो. इथेनॉल मुळे बाष्प तयार होतं. ज्यामुळं वाहनांच्या इंधन टाकीमध्ये पाण्याचा अंश दिसून येण्याची शक्यता अधिक वाढते. परिणामी इंजिन सुरु होण्यास अडचणी येतात आणि तिथं गंज चढण्याचीही शक्यता वाढते. त्यामुळे आता प्रत्यक्षात इथनॉल मिश्रित इंधनाचा वापरात आल्यानंतर कसा परिणाम पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हा निर्णय का घेतला ? (E20 Petrol)
भारतात एकूण गरजेच्या 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करण्यात येते. तर, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे परदेशी चलनाची बचत होण्यासोबत हा एक पर्यावरणपूरक उपायसुद्धा मानला जातो, यामुळे प्रदूषण कमी होत असून, पर्यावरणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जनही कमीच होतं.
जुन्या वाहनात बिघाड होऊ नये म्हणून काय कराल ? (E20 Petrol)
आता तुम्हाला इथेनॉलचा थेट परिणाम जुन्या वाहनांवर होऊ द्यायचा नसेल, सर्वप्रथमक काही गोष्टी करणं आवश्यक असेल. ज्यामध्ये एखाद्या चांगल्या मेकॅनिककडे जाऊन तिला ‘इथेनॉल कंपॅटिबल’ बनवून घेता येऊ शकतं. यासाठी फक्त इंजिनची फ्यूल लाईन आणि गॅस्केट्स बदलून घ्यावे लागतील, जे इथेनॉलमुळे खराब होऊ शकतात. हा छोटासा खर्च तुमच्या गाडीच्या इंजिनचं आयुष्य वाढवू शकतो.



