Economic Offences Wing : नगर : रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक (Fraud) करणारा कंपनीच्या म्होरक्याला तब्बल सात वर्षांनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offences Wing) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २०१८ पासून फरार असलेल्या डॉ. संतोष विश्वनाथ कोथिंबीरे (रा. कोथिंबिरे वस्ती, ता. श्रीगोंदा) याला शनिवारी (ता.६) पुण्यातील मांजरी बुद्रूक येथून ताब्यात घेतले (Arrested) आहे.
नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष
कोतवाली पोलीस ठाण्यात १७ जुलै २०१८ रोजी संगिता सोमनाथ तरटे (रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरुन डॉ. संतोष विश्वनाथ कोथिंबीरे (रा. कोथिंबिरे वस्ती, ता. श्रीगोंदा), भगवतीबाई रतनसिंग सिसोदिया (रा. मक्सी, जि. शहाजा-पूर, राज्य मध्य प्रदेश), संतोष जवाहरसिंग पवार, डॉ. कोथिंबिरे यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहिल्यनगर येथील माळीवाडा परिसरात रिलायवल ग्रुप ऑफ कंपनीची स्थापन करून गुंतवणूकदारांना जास्त परतावा व बक्षिसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात (Economic Offences Wing)
या आमिषातून ३९ लाख रुपयांची रक्कम विश्वासाने घेतली. परंतु गुंतवणूकदारांना परत दिली नाही. तसेच कार्यालय कायमचे बंद केल्याचे उघड झाले. सदर गुन्ह्याचा तपास अहिल्यनगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला होता. पथकाला गुप्त माहितीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणामधून आरोपी डॉ. संतोष कोथिंबीरे पुण्यातील मांजरी बुद्रूक परिसरातील साई श्रध्दापार्क, गोपाळपट्टी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे.



