Economic Offences Wing : नगर : पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या (Senapati Bapat Multistate Co-op Credit Society) अपहार (Embezzlement) प्रकरणी अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offences Wing) पोलिसांनी एका कर्जदाराला अटक केली आहे. महेंद्र साईनाथ मंडलीक (वय ४४, रा. शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या कर्जदाराचे (Borrower) नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवस (ता.१३) पोलीस कोठडी (Police Custody) सुनवली आहे.
नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ
दोन कोटी ५० लाख रूपयांचा अपहार
सुभाष अश्रुजी आंग्रे (वय ७५, रा. अळकुटी, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळातील सदस्य यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपींनी फिर्यादीसह इतर ठेवीदारांना जास्त व्याजदाराचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारून सुमारे दोन कोटी ५० लाख ३८ हजार ६१३ रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, सदरचा गुन्हा पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलिसांनी ठेवीदारांचे घेतले जबाब (Economic Offences Wing)
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत. पोलिसांनी ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेतले असून अपहाराची रक्कम सुमारे सहा कोटींवर पोहचली आहे. या गुन्ह्यात महेंद्र मंडलीक याचा सहभाग निष्पन्न झाला असून त्याला गुन्ह्यात संशयित आरोपी करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मंडलीक याने सेनापती बापट मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालक मंडळाशी संगणमत करून सोसायटीच्या मालकीच्या सुपा एमआयडीसीतील प्लॅट व सुर्यतारा नावाची कंपनी विकत घेतल्याचे तसेच सदर खरेदीसाठी सेनापती बापट संस्थेतूनच कर्ज घेतले असल्याचे निदर्शनास आले आहे.



