Shilpa Shetty:अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा

0
Shilpa Shetty:अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा
Shilpa Shetty:अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा

नगर : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हीच्या सांताक्रूझ येथील घरावर ईडीने छापा (ED Raid) टाकला आहे. पोर्नोग्राफी केससंदर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केली आहे. अडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या अॅपच्या माध्यमातून वितरण केल्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. याच खटल्यासंदर्भात त्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला. त्यामुळे राज कुंद्रा काही दिवस तुरुंगात होता. आता तो या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत.

नक्की वाचा : वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी मंजूर,अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय  

ईडीकडून १५ ठिकाणी छापेमारी (Shilpa Shetty)

अडल्ट कन्टेन्ट तयार करण्याबाबतच्या आरोपात राज कुंद्रा यांच्या कंपनीचे नाव आले होते.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आज उत्तर प्रदेश आणि मुंबईत एकूण १५ ठिकाणी छापेमारी केली. यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घराचाही सहभाग आहे. या छापेमारीत ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. २०२१ साली राज कुंद्रा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणासंदर्भात कारवाई म्हणून एप्रिल २०२४ मध्ये ईडीने राज कुंद्रा यांची ९७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA,२००२ अंतर्गत राज कुंद्रा यांच्यावर सध्या खटला चालू आहे.

अवश्य वाचा : ‘देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी  

२०१८ सालीही राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात (Shilpa Shetty)

सक्तवसुली संचालनालयाने राज कुंद्रा यांची २०१८ साली २०००कोटी रुपयांच्या बिटकॉईन घोटाळ्याबाबत चौकशी केली होती. दरम्यान, ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राज कुंद्रा तसेच शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here