Education System : नगर : केंद्र सरकारचे (Central Government) नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण (Education System) (एनईपी) उच्च शिक्षणात (Higher Education) लागू झाल्यानंतर आता जून २०२५पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात या धोरणाची अंमलबजावणी शाळा पातळीवर करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या जून महिन्यापासून त्यातील काही बदल शिक्षण पद्धतीत दिसून येणार आहेत.
नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप
आठवीपर्यंत एनईपीची अंमलबजावणी तीन टप्प्यांत होणार
पूर्वी ५+२+३+२+३ अशी शिक्षण पद्धती होती. पहिल्या वर्षी तीन ते आठ या वयोगटासाठी, म्हणजेच बालवाडी, शिशूवर्ग, पहिली आणि दुसरी या वर्गांसाठी हा बदल लागू होईल. सन २०२८पर्यंत आठवीपर्यंत एनईपीची अंमलबजावणी तीन टप्प्यांत होणार आहे.
एनईपीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली होती. त्यानंतरचा टप्पा असलेल्या शालेय शिक्षणासाठीची तयारीही राज्य सरकारने सुरू केली होती. एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला. या आराखड्यानुसार शैक्षणिक क्षमता निश्चिती करण्यात आली असून त्यादृष्टीने आता पाठ्यपुस्तके तयार होत आहेत.
अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
दहावी बोर्ड व एम.फिल. बंद करण्यात येणार (Education System)
नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी बोर्ड व एम.फिल. बंद करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक पद्धती ५+३+३+४ या नुसार असणार आहे. यात पाच वर्षांचे पायभूत शिक्षण असेल. त्यात बालक चार वर्षाचा असताना नर्सरीमध्ये प्रवेश मिळेल. सात वर्षाचा असताना पहिलीत या प्रमाणे १८ वर्षांचा असताना विद्यार्थी इयत्ता १२वीत प्रवेश घेईल. पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांऐवजी चार वर्षांचा असेल. पदवीत्तर शिक्षण एक वर्षांचे असेल. त्यानंतर पीएच.डी.ला प्रवेश घेता येणार आहे.
तिसरी ते पाचवी या इयत्तेदरम्यान बहुतेक विषय तसेच असतील. मात्र तिसऱ्या इयत्तेपासून ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ हा विषय समाविष्ट केला जाईल. सहावी ते आठवी या इयत्तांमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या शिफारशीनुसार इतिहास, नागरिक शास्त्र आणि भूगोल या तीन विषयांचे एकत्रीकरण करून सामाजिक शास्त्र हा विषय केला जाईल. कला शिक्षण आणि व्यवसायपूर्व कौशल्ये (प्री-व्होकेशनल स्किल्स) हे दोन विषय सहावी ते आठवीदरम्यान समाविष्ट केले जातील. नववी आणि दहावी या इयत्तांमध्ये कला शिक्षण आणि व्होकेशनल स्किल्स हे नवीन विषय येतील. त्याशिवाय सामाजिक व्यक्तिमत्त्वे आणि पर्यावरण शिक्षण हे दोन नवे विषय शिकवले जातील. नववी आणि दहावीसाठी एकूण विषयांची संख्या १० एवढी असेल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहिल्यांदा १९६८ मध्ये लागू झाले. त्यानंतर दुसरे शैक्षणिक धोरण १९८६ मध्ये आले. आता २०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले असून त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांचा कल कुठल्या विषयाकडे आहे हे शिक्षकांना कळू शकते. यानंतर इयत्ता नववीतच विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेऊन पुढच्या शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडता येणार आहे.