Eid Milad un Nabi : कर्जत : कर्जत सकल मुस्लिम समाजाच्यावतीने मंगळवारी ईद-ए-मिलाद (Eid Milad un Nabi) उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या उपस्थितीत सर्वधर्मियांच्या हस्ते मक्का-मदिना प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रविवारी ईद निमित्त रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) घेण्यात आले. या शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. मंगळवारी संध्याकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
नक्की वाचा : संतप्त नागरिकांनी पुकारले दशक्रिया विधी आंदोलन
पोलिस प्रशासनाची धावपळ
गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच वेळी आल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ होईल व कर्तव्य बजावण्यास मर्यादा पडतील यामुळे सकल मुस्लिम समाजाने शुक्रवारची ईद मंगळवारी साजरी करण्याचे ठरवले होते. सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात ईदगाह मैदानात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत आणि सर्वधर्मियांच्या हस्ते मक्का-मदिना प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.
अवश्य वाचा : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू
यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले की, (Eid Milad un Nabi)
कर्जत संत सदगुरु गोदड महाराज यांची पुण्यभूमी असून या शहरात सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत आहे. सर्व सण-उत्सव सर्वधर्मीय एकत्र येत आनंदाने साजरे करतात हे निश्चित वाखाण्याजोगे आहे. अनेक वर्षांपासून ईद ए मिलादनिम्मित सामाजिक उपक्रम राबवत असून सकल मुस्लिम समाजाचे कौतुक केले. शेवटी मौलाना आखलाक अहमद आणि मौलाना तय्यब पठाण यांनी विश्वशांतीसाठी दुवा मागितली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रतिभा भैलुमे, उषा राऊत, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण घुले, प्रा. शशिकांत पाटील, नगरसेवक भास्कर भैलुमे, सचिन सोनमाळी, प्रा. विशाल मेहेत्रे, अभय बोरा, डॉ. प्रकाश भंडारी, आरपीआयचे संजय भैलुमे, दत्ता कदम, विशाल काकडे, रवी सुपेकर, माजी नगरसेविका हर्षदा काळदाते, काका लांगोरे, सोमनाथ यादव, पांडुरंग क्षीरसागर आदींनी मुस्लिम बांधवास शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वांसाठी सरबत आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.