Ek Daav Bhootacha:अभिनेते मकरंद अनासपूरे,सिद्धार्थ जाधव खेळणार ‘एक डाव भुताचा’,चित्रपटाचे पोस्टर होणार प्रदर्शित 

0
Ek Daav Bhootacha:अभिनेते मकरंद अनासपूरे,सिद्धार्थ जाधव खेळणार 'एक डाव भुताचा',चित्रपटाचे पोस्टर होणार प्रदर्शित 
Ek Daav Bhootacha:अभिनेते मकरंद अनासपूरे,सिद्धार्थ जाधव खेळणार 'एक डाव भुताचा',चित्रपटाचे पोस्टर होणार प्रदर्शित 

Ek Daav Bhutacha : मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेते मकरंद अनासपूरे (Makarand Anaspure), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जातात. आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे हे अभिनेते आपल्या धीरगंभीर भूमिका करून देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव ही जोडी पुन्हा एकदा ‘एक डाव भुताचा’ मांडणार आहेत. लवकरच या जोडीचा हा चित्रपट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नक्की वाचा : देशात पावसाचा मुक्काम वाढला,सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पडणार पाऊस

“एक डाव भूताचा” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित (Ek Daav Bhootacha)

“एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले आहेत. येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. या चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अवश्य वाचा : आधार कार्डवरील पत्त्याचा पुरावा अपडेट करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाह

चित्रपटात कोणते कलाकार झळकणार ? (Ek Daav Bhootacha)

“एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.  

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन तर  प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here