नगर : पालकमंत्रीपदासाठी हट्ट करणे म्हणजे मंत्र्यांचा हावरटपणा आणि आचरटपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली. मंत्रीपद मिळाल्यानंतरही याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Guardian Ministership) मिळावं, यासाठी आग्रह धरला जात आहे. हे हावरटपणाचं लक्षण असल्याचे खडसे म्हणाले. ते आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नक्की वाचा : ‘भाजप चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचाही पक्ष फोडेल’- संजय राऊत
‘एसटीची भाववाढ म्हणजे जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार’ (Eknath Khadse)
एस टीच्या भाववाढीचाही एकनाथ खडसे यांनी निषेध केला आहे. ही भाववाढ म्हणजे सर्व सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.भाव वाढ करण्याऐवजी सरकारनं एस टी महामंडळाचा तोटा सहन करायला हवा होता. एस टी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत जेवण घेतल्या संदर्भात खडसे यांनी अधिक न बोलता नियोजनाच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधी मिळायला हवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.आता काम सरो वैद्य मरो अशी स्थिती आहे. हळूहळू सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ होईल, असे खडसे म्हणाले. एसटीमधील वाढ म्हणजे गरीब माणसांच्या खिशाला झळ असल्याचे खडसे म्हणाले.
अवश्य वाचा : ‘मराठ्यांना हाल हाल करुन मारणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही’- मनोज जरांगे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यार देखील एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. काम करणारा माणूस असल्यावर त्याला गरीब आणि श्रीमंत जिल्हा म्हणायची काय गरज आहे? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.