Eknath Shashthi 2024 : नाथांच्या भेटीसाठी भाविक पालख्यासह पैठणकडे मार्गस्थ

शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत आणि संत एकनाथांचा गजर करत पालख्या पैठण शहराकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. पाचोड- पैठण मार्गावर ठीक ठिकाणी वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांकडून फराळ पाण्याची सोय केली जात आहे

0

नगर : मराठवाड्यातील महत्वाच्या यात्रेपैकी एक असलेली यात्रा म्हणजे पैठणची (Paithan) यात्रा म्हणजेच नाथषष्ठी यात्रा. भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी (Nathshasthi) सोहळ्या निमित्त राज्यभरातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या पैठणकडे आता दाखल होत आहेत. टाळ मृदुंगाचा गजर करत आणि भानुदास एकनाथचा जयघोष करत वारकरी पैठणमध्ये दाखल होत आहे.

नक्की वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

पालख्या पैठण शहराकडे जाण्यास सुरुवात (Eknath Shashthi 2024)

शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत आणि संत एकनाथांचा गजर करत पालख्या पैठण शहराकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. पाचोड- पैठण मार्गावर ठीक ठिकाणी वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांकडून फराळ पाण्याची सोय केली जात आहे.अनेक गावांत रात्री दिंड्या मुक्काम करत असल्याने विविध धार्मिक कार्यक्रम मुक्कामाच्या ठिकाणी पार पडत आहेत. 

अवश्य वाचा : उन्हाचा चटका पुन्हा वाढणार; उकाड्याने नागरिक हैराण

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग  (Eknath Shashthi 2024)

सकाळ झाल्यानंतर दिंड्या पुन्हा आपल्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ देखील आंनदात वारकऱ्यांची सेवा करत आहे. दरम्यान ३१ मार्च रोजी हा नाथ षष्ठी सोहळा पार पडणार आहे. पंढरपूर नंतर सर्वात मोठा सोहळा अशी या यात्रेची ओळख असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त नाथांच्या भेटीसाठी पैठणमध्ये दाखल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here