Eknath Shinde:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’सुरु

राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' (Chief Minister Pilgrimage Scheme) सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

0
Eknath Shinde:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु
Eknath Shinde:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु

नगर : राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ (Chief Minister Pilgrimage Scheme) सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी केली होती.

नक्की वाचा : सामान्यांच्या खिशाला कात्री;भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ

प्रताप सरनाईक यांनी केली योजनेची मागणी (Eknath Shinde)

प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तीर्थ दर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच २० हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याबाबत नियम ठरवू असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू, बाय रोटेशन प्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू, काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांसाठी ही योजना लागू करु,असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल.

अवश्य वाचा : मराठीत नवा प्रयोग; ‘गूगल आई’ चा रहस्यमय टिझर प्रदर्शित

‘पाच ते दहा हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल’ (Eknath Shinde)

प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडल्याप्रमाणे, मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना आम्ही आज सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासाठी धोरण ठरवलं जाईल, शासनाच्या माध्यमातून पाच ते दहा हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असेल. तर हज यात्रा तर आधीपासून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here