Eknath Shinde : नगर : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी महायुतीच्या वतीने पत्रकाकर परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.
नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर,देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दात प्रतिक्रिया
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण
या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी जे बोलतो ते करतो. मराठा समाजाला मी स्वत: आणि आम्ही सगळे मिळून आरक्षण देणार आहोत. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, अशी स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
अवश्य वाचा : भाजपकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरात,मात्र मुख्यमंत्री शब्द वगळला
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की (Eknath Shinde )
यावेळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मनोज जरांगे यांच्या रुपाने मराठा समाजाचं मोठं आव्हान असेल. त्याचा सामना कसा करणार, असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेदेखील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. त्यानंतर तात्काळ विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण कोणी घालवलं, ते त्यांना कोर्टात टिकवता आले नाही. आतादेखील आम्ही आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्यासाठीही आटापिटा सुरु आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली.