Eknath Shinde : नगर : लाेकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार तयारी सुरू केली आहे. एकामागून एक पक्षांच्या उमेदवारांची याद्या जाहीर हाेत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतर्फे (Shiv Sena) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
हे देखील वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
शिवसेना यादीमध्ये यांचा समावेश
या यादीनुसार शिर्डी लाेकसभा मतदार संघातून सदाशिव लाेखंडे, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय महाडीक, मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे, रामटेक लोकसभा मतदार संघातून राजू पारवे, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नक्की वाचा: पाय घसरून पडल्याने दिलीप वळसे पाटील जखमी
यादीत नाशिक मतदार संघाचा समावेश नाही (Eknath Shinde)
नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र नाशिकच्या जागेचाही पहिल्या यादीत उल्लेख नसल्यामुळे हा मतदारसंघ भाजपा किंवा राष्ट्रवादीच्या पारड्यात गेला आहे का? अशी शंका घेतली जात आहे.