Eknath Shinde : नगर : लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर (Helicopter) नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी (Police) त्यांच्या बॅगांची तपासणी केली. परंतु, तपासणीनंतर शिंदे यांच्या बॅगांमध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही.
हे देखील वाचा: ‘सगेसोयरेसाठी’ ४ जूनपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार
संजय राऊतांनी केला होता आरोप
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे प्रचार सभेसाठी गेले असता, त्यांच्या सोबत पैशांच्या बॅगा असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यानंतर आज जेव्हा एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या बॅगांची तपासणी केली.
नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त
मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप (Eknath Shinde)
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडत असताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आपल्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. संजय राऊतांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला होता.