Eknath Shinde : वयोवृद्धांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde : वयोवृद्धांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
Eknath Shinde : वयोवृद्धांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Eknath Shinde : वयोवृद्धांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde : नगर : ज्येष्ठ नागरिकांची (Senior Citizen) काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरू असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. मुंबईतील (Mumbai) सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठकीत ते बोलत होते.

नक्की वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर

मुख्यमंत्री म्हणाले (Eknath Shinde)

”नुकत्याच झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. सन २०४७ पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू

प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्राची निर्मिती (Eknath Shinde)

सध्या शासनाने ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना सुरू केली असून त्याद्वारे थेट डीबीटीद्वारे लाभाचे वितरण करण्यात येत आहे. सोबतच एसटी प्रवास सवलत देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात येईल. या केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिमेंशिया, अल्जायमर या आजाराबाबत सहायता उपलब्ध करून देण्यात येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here