Eknath Shinde : नगर : बांगलादेशातील (Bangladesh) अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या (Students) सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे. बांगलादेशमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तातडीची मदत मिळावी तसेच त्यांना मायदेशात परतण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाचे पाऊले उचलली आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी (Ministry of External Affairs) संपर्क साधला आहे.
नक्की वाचा: भारताला मोठा धक्का!विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र
मुख्यमंत्र्यांकडून उपाययोजना
हिंसाचारग्रस्त बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून परराष्ट्र मंत्रालयाला सोपविली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांशी लवकरात-लवकर संपर्क साधून त्यांना मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.
अवश्य वाचा: निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा : आमदार थोरात
मायदेशात परतण्यासाठी सर्व उपाययोजना करणार (Eknath Shinde)
या माध्यमातून बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांना मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे.