नगर : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा (Death penalty) झाली पाहिजे,असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करेल,असंही शिंदेंनी सांगितलं. तसंच पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत (Pune atrocities) आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील आपण दिले असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता मिळण्यास सुरवात
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर सर्व स्तरांतून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
अवश्य वाचा : प्रयागराजमधील महाकुंभात ६५ कोटी भाविकांनी केले स्नान
‘नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी’ (Eknath Shinde)

पुण्यातील घटनेच्या तपासावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघे स्वत:लक्ष ठेऊन आहेत. मी देखील पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आहे,आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. लाडक्या बहिणींना एसटी बसमधून जास्तीत जास्त प्रवास करता यावा, यासाठी आम्ही त्यांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली आहे. मात्र अशा प्रकारे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी, त्यासाठी सरकार प्रयत्न करेल,असं यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, कोणीही कोणत्याही पक्षाचा असूद्या, कुणाशीही संबंधीत असूद्या,अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही. कुणाशीही संबंध असू द्या, कुणाशीही लागेबांधे असूद्या,हा गुन्हेगार गुन्हेगार आहे. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही”,असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
प्रकरण नेमकं काय ? (Eknath Shinde)
२५ फेब्रुवारीला पहाटे ५.३० वाजता पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर ही धक्कादायक घटना घडली. एक २६ वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली असताना आरोपीने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने आरोपीला सांगितलं. मात्र, एकट्या मुलीचा फायदा घेत त्या आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.