Eknath Shinde: दरे गावात आलो की अनेकांना पोटदुखी,त्यांचा बंदोबस्त केलाय;एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर 

0
Eknath Shinde: दरे गावात आलो की अनेकांना पोटदुखी,त्यांचा बंदोबस्त केलाय;एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर 
Eknath Shinde: दरे गावात आलो की अनेकांना पोटदुखी,त्यांचा बंदोबस्त केलाय;एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर 

Eknath Shinde: मी दरे गावात आलो की,अनेकांची पोटदुखी सुरू होते. अशासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय,अशी खोचक टीका (Criticism) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केली आहे. मुद्दा नसल्यामुळे विरोधक कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत आहेत.असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळी दिवाळी आंदोलनावर भाष्य करत टीका केली आहे. मी दरे गावी आलो की, विरोधकांचं पोट दुखू लागतं. दिल्लीला गेले की पोटात दुखत. मी त्याचा विचार करत नाही. या सर्व पोटदुखीवाल्यांचा बंदोबस्त केला आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत आहे, असेही ते म्हणाले.

नक्की वाचा: दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास  

शेतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा एकनाथ शिंदेंकडून समाचार (Eknath Shinde)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरे गावात जात सफरचंदाच्या बागेत जाऊन सफरचंदाच्या झाडांची पाहणी केली. यावेळी स्वतः रोटर हातात घेऊन मशागत केली. यावेळी शेतात काम करत असताना त्यांच्यावर शेतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगला समाचार घेतला. विरोधकांकडे आता मुद्दे नाहीत. पूर परिस्थितीबाबत त्यांना वाटले नव्हते, बत्तीस हजाराचे पॅकेज हे सरकार शेतकऱ्यांना देईल. मी म्हणालो होतो, दसऱ्याच्या मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याप्रमाणे आम्ही पैसे देणे सुरू केले आहे. त्यामुळे ते काय बोलणार, काय मुद्दा नाही. कुठल्याही गोष्टीचा राजकारण करायचं त्यांनी ठरवलं आहे. 

अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!

‘विरोधक दिशाभूल करायचं काम करतात’ (Eknath Shinde)

शेती असो किंवा निवडणूक असो, विरोधक दिशाभूल करायचं काम करतात. चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुके देत होते आणि आता टीका करतात. ही दुटप्पी भूमिका आहे. हे कायम रडगाणं आहे. बाळासाहेबांनी आम्हाला कधीही रडायला शिकवलं नाही. लढायला शिकवला आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.