Eknath Shinde: एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री शिंदेंचा लाडक्या बहिणींना शब्द

0
Eknath Shinde: एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री शिंदेंचा लाडक्या बहिणींना शब्द
Eknath Shinde: एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री शिंदेंचा लाडक्या बहिणींना शब्द

नगर : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) माझी सर्वात आवडती योजना आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होतो अन् लाडकी बहीण योजना सुरू होते. त्यामुळे लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे आहे, तोपर्यंत बंद पडू देणार नाही. असा विश्वास देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केलं. नाशिकच्या सटाणा येथे ते बोलत होते.

नक्की वाचा: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

शेतकऱ्यांसाठी योजना, तरुणासाठी योजना अशा अनेक योजना महाराष्ट्राच्या जनतेसाठी महायुती सरकारने केल्या आहेत. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पण नाव महत्वाचे आहे. ते नाव जपायचे काम मी केले आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. पायाला भिंगरी बांधून फिरतो आहे. लाडक्या बहिणींनी एवढा मोठा विजय मिळवून दिला, इतिहास घडला आहे. विरोधकांनी सरकार बनवले, पण त्यांचे मनसुबे उधळून टाकले,असंही त्यांनी सांगितले.

‘नगराध्यक्ष पद आले की बाकी माझ्यावर सोडा’ (Eknath Shinde)

स्वार्थ आमचा अजेंडा नाही, खुर्चीवर ज्यांनी बसविले त्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. नगराध्यक्ष आपला तर विकास आपला. नगराध्यक्ष पद आले की बाकी माझ्यावर सोडा. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दिलेला शब्द आम्ही पाळतो. शेतकरी कुटुंबातील मी आहे, मुख्यमंत्री झालो. काही लोकांची पोटदुखी सुरू आहे. तुम्ही त्यांना जमाल गोटा द्या. अशी मिश्किल टीकाही एकनाथ शिंदे यांनी केलीय.

अवश्य वाचा:  ‘रावणालाही एवढा अहंकार नव्हता एवढा भाजपला आहे’- हर्षवर्धन सपकाळ  

‘लाडक्या बहिणींना येणारे १५०० रुपये देऊन थांबणार नाही’ (Eknath Shinde)

मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वसाधारण कार्यकर्ता आहोत. मी सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही. लाडक्या बहिणींना येणारे १५०० रुपये देऊन थांबणार नाही. त्यांना स्वावलंबी बनवणार. मी खोटे बोलणार नाही, माझी भूमिका स्पष्ट विकास असून गोरगरिबांच्या जीवनात आनंद आणायचे काम करायचे आहे. कमावलेली माणसे यावर शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची वाटचाल सुरू आहे. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.