Eknath Shinde: शहाजी बापू पाटील रुग्णालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

शहाजीबापू पाटील हे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ असून, लवकरात लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

0
Eknath Shinde
Eknath Shinde

नगर : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या गुडघ्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (ता.३) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) जाऊन त्यांची भेट घेत चौकशी केली.

नक्की वाचा : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास होणार महाग; आजपासून टोल दरात वाढ  

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया (Eknath Shinde)

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले मूळ गाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शहाजीबापूंची  फोनवरून चौकशी केली होती. त्यानंतर आज मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी बापूंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी लवकरात लवकर त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

अवश्य वाचा : विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवास उलगडणार ‘बंटी बंडलबाज’ चित्रपटातून

‘बापूंनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावे’ (Eknath Shinde)

शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली होती. त्या वेळी शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचे कामही शहाजी पाटील यांनी केले होते. त्यानंतर ते काय झाडी काय डोंगर या त्यांच्या वक्तव्यामुळे ते जोरदार चर्चेत आले होते. दरम्यान, शहाजीबापू पाटील ही तोफ बिछान्यावर पडून नव्हे तर भर सभेत विरोधकांना चारही मुंड्या चित करताना दिसायला हवी, यासाठी बापूंनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कुटूंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे हे देखील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here