नगर : प्रत्येकाला आपल्या पक्षातील मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असते.आम्हाला देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde)हे मुख्यमंत्री होतील,असे वाटत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून लोकांनी कल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केला. दरम्यान,आम्हाला गुवाहाटी पार्ट २ करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ असं वक्तव्य देखील शिरसाट यांनी केलं आहे.
नक्की वाचा : महायुतीच्या १६० पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार,सूरज चव्हाण यांचा दावा
‘राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार’ (Eknath Shinde)
राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, महायुतीचा प्रचार पॉझिटिव्ह होता. जनतेला प्रचार भावला. कोणत्याही निवडणुकीत अपक्षांची संख्या ही २० पर्यंत असते, ते कोण असतात तर ते बंडखोर असतात. त्यामुळं ते सत्ता येणाऱ्यांसोबत कल देत असतात. जर आम्हाला दोन चार अपक्षांची गरज पडली तर ते आमच्यासोबत येतील. अपक्ष आमच्या संपर्कात असल्याचे शिरसाट म्हणाले. एक्झिट पोलवर सर्व अंदाज पाहणे योग्य नाही, निकाल बाहेर येऊ द्या असेही शिरसाट म्हणाले.
अवश्य वाचा : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
‘महाविकास आघाडी कधीच एकत्र आली नाही’ (Eknath Shinde)
महाविकास आघाडी कधीच एकत्र आली नाही. सर्व्हेत शिवसेना ठाकरे गट लॉसमध्ये आहे, त्यांची बदललेली भूमिका हे त्याला कारण असल्याचे शिरसाट म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी साथ दिली नाही, त्यामुळे त्यांची पीछेहाट झाली आहे. राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.