Ekvira Chashak : संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकविरा फाउंडेशनच्या वतीने डॉ. जयश्रीताई थोरात (Jayashree Thorat) यांच्या नेतृत्वात महिलांना क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिली. एकविरा फाउंडेशनच्या (Ekvira Chashak) वतीने झालेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच सामन्यांमध्ये तालुक्यातील सात हजार ३५० महिलांनी सहभागी होत पाच दिवस या सामन्यांचा आनंद लुटला. तर अंतिम सामन्यात खुल्या गटात शेती मातीत राबणाऱ्या घुलेवाडी येथील रुक्मिणी ग्राम संघाने क्रिकेट मधील पहिले बक्षीस पटकावले. तर सावित्रीच्या लेकी यांनी रस्सीखेच स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले.

नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
पाच दिवस महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनतर्फे पाच दिवस महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, कांचन थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आयोजक डॉ. जयश्री थोरात, प्रमिला अभंग, अर्चना बालोडे, दीपाली वरपे, राजेंद्र काजळे मालती डाके, सुभाष सांगळे, रचना मालपाणी, विक्रम ओहोळ, राहुल गडगे आदी उपस्थित होते.
महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये खुल्या गटात घुलेवाडी रुक्मिणी ग्राम संघाने वडगाव वाघिणी संघावर १८ धावांनी मात केली. त्यांना एकविरा चषक व प्रथम क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तर वडगावच्या वाघिणी संघाला द्वितीय क्रमांकाचे सात हजार बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात आले. तर तृतीय क्रमांक हा संगमनेर येथील कळसुबाई ग्रुपने पटकावला. त्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस व चषक देण्यात आला.

अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
महाविद्यालय गटात भाऊसाहेब थोरात महाविद्यालय प्रथम (Ekvira Chashak)
महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाने मिळवला. तर द्वितीय क्रमांक अमृतवाहिनी पॉलिटेक्निक व तृतीय क्रमांक सह्याद्री ज्युनिअर कॉलेजने पटकावला. तर शालेय गटामध्ये प्रथम क्रमांक श्री.श्री.रविशंकर इंग्लिश मीडियम स्कूल यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक सह्याद्री विद्यालय संगमनेर यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलने मिळवला.

रस्सीखेच स्पर्धेमध्ये शालेय गटामध्ये प्रथम क्रमांक आदर्श विद्यालय वडगाव लांडगा यांनी मिळवला. तर द्वितीय क्रमांक सह्याद्री विद्यालय संगमनेर यांनी मिळवला. तृतीय क्रमांक शुक्लेश्वर विद्यालय सुकेवाडी यांनी मिळवला. महाविद्यालय गटामध्ये प्रथम क्रमांक बीएसटी कॉलेज संगमनेर यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक सह्याद्री जुनियर कॉलेज यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक रमेश फिरोदिया कॉलेज साकुर यांनी मिळवला. खुला गटामध्ये प्रथम क्रमांक सावित्रीच्या लेकी या ग्रुपने मिळवला. तर द्वितीय क्रमांक सटू बाबा गट समनापुर यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक हिरकणी वडगाव पान या संघाने मिळवला.